मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं कमी वेळेत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून रिंकु राजगुरुचं नाव घेता येईल. प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटामध्ये रिंकुनं भूमिका केली होती. तिचा तो पहिला चित्रपट. त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. सध्याच्या घडीला मराठी अभिनेत्रींमध्ये ती आघाडीची अभिनेत्री आहे.वेबसीरिज असो वा चित्रपट रिंकुनं दमदारपणे आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेतलं आहे.





Esakal