मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांपासून बॅक स्टेज आर्टिस्टवर देखील आर्थिक संकट कोसळल्याचे दिसून आले आहे. अशावेळी ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला या कलाकारांनी कलाकारांसाठी कोरोना च्या काळात मदतीचा हात पुढे करण्यात आला.

या कार्यक्रमामध्ये अभिनेता आनंद इंगळे, विजय पटवर्धन राहुल जोशी जितेंद्र भुरुक दीपाली सय्यद संदीप पाटील मनीष रब्दी प्रताप्राव मोहिते दीपक ऊर्फ आप्पा वायकर अशा अनेक दानशूर लोकांना सन्मानित करण्यात आले…
सिनेअभिनेते प्रवीण तरडे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले लक्ष्मिकांत खाबिया अभिजीत कवठाळकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रवीण तरडे म्हणाले, ऑल आर्टिस्ट फाउंडेशन च्या माध्यमातून जे काही कलाकारांच्या हिताचे कार्य चालू आहे त्याकरता आमचा पाठिंबा आहे.
मेघराज राजे भोसले यांनी संस्थेच्या सभासदांना राज्य शासनाच्या अंतर्गत सभासदत्व मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. याप्रसंगी सिने-नाट्य क्षेत्रातील कला लावणी लोकधारा ऑर्केस्ट्रा क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here