भारतात सण उत्साहाने साजरा करतात. सणासुदीच्याकाळात पारंपारिक पदार्थ किंवा काहीतर गोड पदार्थ हमखास बनवितातच. त्यात सध्या दिवाळीचा सण सगळीकडे उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. प्रत्येकाच्या घरात मिठाई- फराळ बनविले जात आहेत. सर्वच सण सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांचा आनंद लुटतात पण, नंतर मात्र परिणाम आपल्या वजनावर दिसतो. सणसूदीच्या काळात तुम्हाला प्रत्येकजण वजन वाढू नये म्हणून प्रत्येकजण सल्ले देत असतात, त्यात तर दिवाळी खूप जास्त प्रमाणात तुम्हाला अशा सुचना मिळतात. पण वजन नियंत्रित करण्यासाठी काय करावे, कोणते सल्ले ऐकावे हेच समजत नाही. तुम्हाला काही सल्ल्यांकडे दुर्लक्ष करून तेच केले पाहिजे जे तुम्हाला योग्य वाटते. (Festive weight loss tips you should never follow)

हेल्दी मिठाई ऑर्डर करू नका –
वजन वाढू नये म्हणून तुम्ही शुगर फ्री मिठाई, किंवा बेक (Baked) पदार्थ ऑर्डर करता. नक्कीच या पदार्थामुळे तुम्हाला वजन नियंत्रित ठेवण्यासाठी फायदा होऊ शकतो पण तेव्हाच जेव्हा तुम्ही हे पदार्थ योग्य प्रमाणात खाता तेव्हा. कित्येकदा काही लोक शुगर् फ्री आहे, बेकड पदार्थ आहेत म्हणून गरजेपेक्षा जास्त खातात. त्यामुळे हेल्दी मिठाई अजिबात आर्डर करू नका. त्यापेक्षा एक मोतीचूरचा लाडू खा आणि दिवाळी एन्जॉय करा.

सणासुदीचे पदार्थ खाण्यापूर्वी उपवास करू नका –
सणासुदीला घरी पंचपक्वान किंवा काहीतरी स्पेशल डिश असते. बऱ्याचदा काही लोक अशावेळी दिवसभर उपवास करतात. पण नंतर इतकी भूक लागलेली असते की तुम्ही तेव्हा गरजेपेक्षा जास्त जेवतात. ही खूप अयोग्य पध्दत आहे. त्यामुळे तुम्हाला अॅसिडीटी होऊ शकते.

तुमचा गिल्ट बाजुला ठेवा-
सणासुदीनंतर तुमचे वजन वाढले तर त्याचे तुम्हाला नंतर वाईट वाटते. कशाला दिवाळीत आपण मिठाई खाल्ली…असा विचार तुम्ही करता पण एक किंवा दोन दिवस असे पदार्थ खाल्यामुळे वजन वाढत नाही. तुम्ही वर्षभर रोज काय खाता यावर तुमचे वजन वाढणार की कमी होणार हे डिपेंड असते. त्यामुळे सणाचा आनंद घ्या.

स्नॅक्स खायला विसरू नका –
लोक कित्येकदा त्यांच्या सणासुदीच्या स्पेशल मेजवानीची इतकी आतुरतेने वाट पाहतात की दरम्यानच्या वेळेत काहीतरी स्नॅक्स खायचे ते विसरतात. त्यामुळे नंतर तुम्हाला खूप भूक लागल्यामुळे तुम्ही खूप जास्त जेवता. त्यामुळे दरम्यानच्या काळातील स्नॅक्स खायला विसरू नका

डान्स करा आणि एन्जॉय करा –
सर्वात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेलब्रेशन करण्यासाठी वेगळा मार्ग निवडा. म्युझिक चालू करून तुमच्या कुटुंबासमवेत डान्स करा. दिवाळीत फक्त खाणे नाही तर तुमच्या जवळच्या लोकांसोबत चांगला वेळ घालवणे गरजेचे आहे. डान्समुळे तुमचा मूड देखील फ्रेश होईल आणि तुमच्या काही कॅलरीज देखील बर्न होतील.
Esakal