टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी BCCI ने बुधवारी माजी कर्णधार राहुल द्रविड याची नियुक्ती केल्याचे जाहीर केले. राहुल द्रविडच्या नियुक्तीनंतर साऱ्यांनीच त्याचे अभिनंदन केले. रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ टी२० विश्वचषक २०२१च्या शेवटी संपणार आहे. त्यामुळे द्रविडने हे पद स्वीकारावे अशी विनंती BCCI कडून करण्यात आली होती. दुबईत असताना BCCI अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांची द्रविडशी बैठक झाली होती. तेव्हाच द्रविड मुख्य प्रशिक्षक होणार हे स्पष्ट झालं होतं. पण बुधवारी BCCI कडून अधिकृत घोषणा करण्यात आली. या घोषणेनंतर भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर यांनी द्रविडबद्दल एक महत्त्वाचं वक्तव्य केलं.

हेही वाचा: T20 WC: “भारताला वाटतं IPL म्हणजे…”; वासिम अक्रमचा टोमणा

“भारतीय क्रिकेट हे दिवसेंदिवस पुढेच गेलं पाहिजे. राहुल द्रविड या जेव्हा स्वत: खेळाडू म्हणून मैदानात खेळायचा, त्यावेळी त्याच्या वर्तणुकीत शिस्त आणि शिष्टाचार होते. त्यामुळे तो जेव्हा प्रशिक्षकपदाचा पदभार स्वीकारेल तेव्हा तो नक्कीच ती शिस्त आणि शिष्टाचार युवा खेळाडूंच्या वर्तणुकीत आणेल याचा मला विश्वास आहे. स्वत: खेळताना तो प्रत्येक परिस्थितीचा संयमी पद्धतीने विचार करत होता. त्यापद्धतीचा विचार करण्याची सवय तो सध्याच्या खेळाडूंनाही लावेल”, असा विश्वास गावसकर यांनी व्यक्त केला.

सुनील गावस्कर

सुनील गावस्कर

हेही वाचा: T20 WC: टीम इंडियाचं नक्की काय चुकतंय? सचिनने दिलं उत्तर

भारत-अफगाणिस्तान सामन्याबद्दल बोलताना ते म्हणाले, “तुमच्या संघातील खेळाडूंमध्ये तर्कशुद्धता असायला हवी. तुम्हाला तुमच्या संघाने केलेल्या प्लॅन्सबद्दलची कल्पना असणं चांगली गोष्ट आहे. पण त्यासोबतच तुम्हाला तुम्ही योग्य दृष्टीकोन ठेवून मैदानात उतरायला हवे. मला असं वाटतं की गेल्या आठवड्याभरात अफगाणिस्तानवर भारताचा विजय हीच एक गोष्ट भारतासाठी चांगली घडली आहे. तसंही या स्पर्धेनंतर संघाचे प्रशिक्षक बदलणार आहेत. त्यामुळे त्यांना आधीच नियुक्त केल्याचा फायदा होईल. त्यांना संघाच्या खेळाडूंचा अभ्यास करायला नीट वेळ मिळेल”, असं गावसकर यांनी स्पष्ट केले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here