संपूर्ण देशात आज दिवाळीचा उत्साह आहे. नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपुजन एकत्र आल्याने हा आनंद द्विगुणित झालाय. कोरोनाच्या सावटानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी होत आहे. मात्र, यंदा ही दिवाळी फक्त पृथ्वीवर नाही, तर सूर्यावरही होत आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.

सूर्याच्या पृष्ठभागावर सौर ज्वालांच्या भडकण्याने अंतराळात एक चुंबकीय वादळ सुरू केले आहे. ते 4 नोव्हेंबरपर्यंत पृथ्वीवर आदळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, याचा पृथ्वीला धोका नसून काही उपग्रहांना धोका संभवू शकतो.

या वादळामुळे ध्रुवीय प्रदेशात वातावरण उजळले आहे, आणि तेही दिवाळीच्या वेळी! दोन्ही ध्रुवांवर दिसणार्‍या प्रकाशाच्या रंगीत छटा सूर्यावरील हालचाली सांगतात. त्यानुसार तयार केलेल्या मॉडेल्सवर आणि NASA च्या वेधशाळांमधील डेटावर आधारित काही बाबींवर उत्तर गोलार्धातील अनेक देश या रंगीत छटा पाहतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सूर्याच्या पृष्ठभागावर सौर ज्वालांच्या भडकण्याने अंतराळात एक चुंबकीय वादळ सुरू केले आहे. (फोटो सौजन्य- द हिंदू)

सूर्याच्या पृष्ठभागावर सौर ज्वालांच्या भडकण्याने अंतराळात एक चुंबकीय वादळ सुरू केले आहे. (फोटो सौजन्य- द हिंदू)

नासाच्या डीप स्पेस क्लायमेट ऑब्झर्व्हेटरी (डीएससीओव्हीआर) उपग्रहाकडील जवळजवळ रिअल-टाइम डेटाचा आधार घेत, शास्त्रज्ञांनी ट्रान्सव्हर्स मॅग्नेटिक फील्ड, घनता आणि प्लाझ्मा, वाऱ्याचा वेग यांमध्ये मोठ्या हालचाली नोंदवल्या आहेत.

IISER कोलकाता येथील सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पेस सायन्सेस इंडिया (CESSI) आणि युनायटेड स्टेट्स नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन (NOAA) स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरसह जगभरातील सौर शास्त्रज्ञ या वादळाच्या प्रगतीचा अभ्यास करत आहेत.

दिवाळी सोलर स्टॉर्म

भारतीय वेळेनुसार पहाटे 1.00 वाजता हा प्रकार घडेल. हे कोरोनल मास इजेक्शन फ्लक्स आहे की नाही, हे त्याच्या उत्क्रांतीच्या आधारे ते जाण्याच्या वेळी कळेल. ही निरीक्षणे Lagrange Point L1 येथे घेण्यात आली आहेत”, अशी माहिती CESSI, कोलकाताचे दिब्येंदू नंदी यांनी दिली. त्यांनी ‘द हिंदू’शी संवाद साधला. जर हे वादळ पृथ्वीवर आले, तर त्याला दिवाळी सोलर स्टॉर्म म्हणता येईल, असं त्यांनी म्हटलंय.

काय प्रकरण आहे?

सूर्यापासून नुकतेच एक चुंबकीय वादळ निर्माण झाले आहे. ज्याचा प्रभाव पृथ्वीवर आज म्हणजेच ४ नोव्हेंबर रोजी दिसणार आहे. या चुंबकीय वादळामुळे पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशात म्हणजेच उत्तर आणि दक्षिण ध्रुवाला लागून असलेल्या भागात तीव्र प्रकाश दिसेल.

सौर वादळाच्या येणाच्या दिवस आणि पृथ्वीशी टक्कर होण्याच्या दिवसानुसार त्याचे नाव देण्यात आले आहे. उदाहरणार्थ, 2000 साली आलेल्या सौर वादळाला ‘बॅस्टिल डे’ असे नाव देण्यात आले. त्याचप्रमाणे 2003 साली आलेल्या वादळाला ‘हॅलोविन डे’ असे नाव देण्यात आले. 2015 मध्ये वादळ आले होते. त्याला ‘सेंट पॅट्रिक्स डे’ असे नाव देण्यात आले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here