आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेलं जोडपं. गेल्या काही वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. त्यांना एकाच फ्रेममध्ये पाहणं ही त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब असते. त्यातच आता आलियाने सोशल मीडियावर शेअर केलेला एक फोटो सध्या तुफान व्हायरल होत असून तिने पहिल्यांदाच अभिनेता रणबीर कपूरसोबत एक फोटो शेअर करत असत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट
आलिया भट्टने दिवाळीच्या निमित्ताने दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये ती सोनेरी निळ्या लेहेंग्यात दिसली आहे. पहिल्या पोस्टमध्ये आलिया हातात मेणबत्ती घेऊन पोज देताना दिसली.
तर दुसऱ्या पोस्टमध्ये रणबीर कपूरसोबत पोज देताना दिसते आहे. या फोटोमध्ये लव्हबर्ड्स एकमेकांना घट्ट धरून पोज देताना दिसले. काही प्रकाश आणि काही प्रेम असं म्हणत त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
Esakal