नोव्हेंबरचा पहिला आठवडा केवळ सण-उत्सवांचाच नव्हे, तर सुट्ट्यांचा देखील आहे. 4 नोव्हेंबरला दिवाळी, 5 ला पाडवा आणि 6 तारखेला भाऊबीजची सुट्टी असेल, तर 7 नोव्हेंबरला रविवार असणार आहे. अशा प्रकारे लोकांना 4 दिवस सुट्टी मिळणार आहे. या कालावधीत उत्तम सहलीचं नियोजन करु शकता.
बीर बिलिंग (हिमाचल प्रदेश) – दिल्ली-एनसीआरमध्ये राहणारे लोक 4-5 दिवसांत बीर बिलिंगला भेट देण्याची योजना बनवू शकतात. हिमाचल प्रदेशमध्ये असलेलं हे सुंदर ठिकाण पॅराग्लायडिंग, ट्रेकसाठी प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला तिबेटी संस्कृतीची झलकही पाहायला मिळेल.ऋषिकेश (हरिद्वार) – धार्मिक आणि नैसर्गिक दोन्ही दृष्टिकोनातून ऋषिकेश हे एक उत्तम ठिकाण आहे. गंगा घाट आणि मंदिर हे येथील प्रमुख आकर्षण आहे. रात्री मंदिरांमध्ये होणारी आरती पर्यटकांना आकर्षित करते. इथं गेल्यानंतर तुम्ही शिवपुरीलाही जाऊ शकता. जिथं राफ्टिंग, कॅम्पिंग ट्रेकिंग आणि बंजी जम्पिंगचा आनंद घेऊ शकता.सोनमर्ग (काश्मीर) – सोनमर्ग हे नवविवाहित जोडप्यांसाठी एक उत्तम हनिमून डेस्टिनेशन आहे. काश्मीरचे पर्वत, बागा आणि अनेक प्रकारची सरोवरं त्याचं सौंदर्य वाढवतात. येथील डल सरोवर सर्वात प्रसिद्ध आहे. जर तुम्ही भाग्यवान असाल, तर हिमवर्षाव देखील पाहू शकता.मुक्तेश्वर (उत्तराखंड) – उत्तराखंडचं हे ठिकाण पर्यटकांमध्ये सुंदर नैसर्गिक दृश्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथं जाऊन तुम्ही स्वच्छ आणि थंड हवेचा आनंद घेऊ शकता. तसेच तुम्ही ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, बाइकिंग, राफ्टिंगचा देखील आनंद घेऊ शकता.राणीखेत (उत्तराखंड)- उत्तराखंडमध्ये वसलेलं राणीखेत हे एक भव्य हिल-स्टेशन आहे. जर तुम्हाला निसर्गासोबत वेळ घालवायला आवडत असेल, तर तुम्ही या नोव्हेंबरच्या सुट्ट्यांमध्ये राणीखेतलाही भेट देऊ शकता. इथं तुम्ही पॅराग्लायडिंग, बाईक रायडिंग, राफ्टिंग देखील करू शकता.