आफ्रिका : आफ्रिकन देश नायजरच्या (Niger) दक्षिण-पश्चिम भागात बंदुकधारींच्या हल्ल्यात Gunmen attack in Niger) महापौरांसह किमान 69 लोक ठार झाले आहेत. सरकारनं या हल्ल्याला दुजोरा दिलाय. बुर्किना फासो (Burkina Faso) आणि मालीच्या (Mali) नायजर सीमेजवळ हा हल्ला झाला. हा भाग एक अस्थिर प्रदेश आहे, जो आफ्रिकेतील (Africa) साहेल प्रदेशाच्या (Sahel region) पश्चिम भागात सुरक्षा दल, इस्लामिक स्टेट (Islamic State) आणि अल-कायदाशी संलग्न सशस्त्र गट यांच्यात वर्षानुवर्षे लढत आहे.

बानीबांगोच्या (Banibangou) महापौरांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळावर बंदूकधाऱ्यांनी मंगळवारी हल्ला केला. शहरापासून 50 किमी अंतरावर असलेल्या मालीच्या सीमेजवळ हा हल्ला झालाय. बंदुकधारी हल्ल्यातील मृतांची संख्या जाहीर करताना, गृहमंत्री अल्काचे आल्हादा (Alkache Alhada) यांनी सरकारी दूरचित्रवाणीवर सांगितलं की, या हल्ल्यातून 15 जण वाचले असून शोध मोहीम अजूनही सुरू आहे. या हल्ल्याचं मुख्य ठिकाण अदब-दाब गाव म्हणून ओळखलं जातंय, एएफपी एजन्सीचं म्हणण आहे.

हेही वाचा: ‘हा’ आहे जगातला सर्वात महागडा मासा; किंमत करोडोंत

नायजर

नायजर

आतापर्यंत 530 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

या हल्ल्यात दक्षता समिती नावाच्या स्थानिक संरक्षण दलाला लक्ष्य करण्यात आल्याचं आणखी एका सूत्रानं सांगितलंय. हल्लेखोर त्यांच्या सैनिकांचे मृतदेह घेऊन मालीला परतले आहेत. ‘आर्म्ड कॉन्फ्लिक्ट लोकेशन अॅण्ड इव्हेंट डेटा प्रोजेक्ट’ने (ACLED) दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम नायजरच्या सीमावर्ती भागात नागरिकांवरील हल्ल्यांमध्ये 530 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय, जो 2020 च्या तुलनेत 5 पटीनं अधिक आहे. ACLED हा सल्लागार गट आहे, जो जगभरातील राजकीय हिंसाचाराचा मागोवा घेतो.

हेही वाचा: ‘हे’ आहे जगातलं सर्वात महागडं ‘पाणी’

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here