
फॅशन क्वीन उर्फी जावेदची गणना टीव्ही इंडस्ट्रीत ‘ग्लॅमरस गर्ल’ म्हणून केली जाते. उर्फी तिच्या बोल्ड लूकसाठी नेहमीच चर्चेत असते.

आज दिवाळीच्या खास मुहूर्तावर देखील उर्फीनं चाहत्यांना निराशा केलेलं नाही. दिवाळीच्या निमित्तानं उर्फीनं पारंपरिक पोशाखातील तिचे साडीतील आकर्षक फोटो शेअर केले आहेत.

उर्फी नारंगी आणि गुलाबी रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. त्यावर तिनं गडद गुलाबी रंगाचा ब्लाउज् घातलाय.

उर्फीनं तिचा लूक कमीत-कमी ग्लॉसी मेकअप आणि फ्लोरल पॅटर्नच्या इअर रिंगसह पूर्ण केलाय. साडीतील उर्फीचे सुंदर फोटो इंटरनेटचा पारा वाढवत आहेत.

उर्फीनं तिचे फोटो खास कॅप्शनसह शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये ती लिहिते, माझ्या प्रियजणांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा.. फटाके फोडू नका, असा सल्ला तिनं दिलाय.

दिवाळी पोस्टच्या दोन्ही फोटोंमध्ये उर्फी वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. साडीतील उर्फीचा पारंपरिक लूक चाहत्यांना वेड लावत आहे.
Esakal