बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या पतीसोबत लॉस एंजिलिसमध्ये राहत आहेत. मात्र परदेशात असूनही प्रियांका भारतीय परंपरेनुसार लक्ष्मीपूजन करण्यास आणि दिवाळी साजरी करण्यास विसरली नाही. नुकतेच तिने लक्ष्मीपूजनाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

पती निक जोनाससोबत प्रियांका लक्ष्मीपूजन करताना पहायला मिळतेय.
लक्ष्मीपूजनासाठी प्रियांकाने पिवळ्या रंगाची साडी नेसली असून निकने कुर्ता-पायजमा परिधान केला आहे.
चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत प्रियांकाने हे खास फोटो पोस्ट केले आहेत.
‘परदेशातही आपली संस्कृती पोहोचवतेस, यासाठी तुझा अभिमान वाटतो’, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत.
‘अध्यात्मिकदृष्ट्या आम्हा दोघांचेही विचार जुळतात. एखादी मोठी गोष्ट सुरू करण्याआधी निक मला नेहमीच पूजा करण्यात सांगतो,’ असं प्रियांकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
प्रियांकाने प्री-दिवाळी सेलिब्रेशनचेही काही फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये ती लिली सिंग आणि मिंडी कालिंग यांच्यासोबत पहायला मिळतेय.
प्रियांकाने २०१८ मध्ये निक जोनासशी लग्न केलं. लग्नानंतर ती परदेशात राहत आहे.
लॉस एंजिलिसमध्ये प्रियांकाची दिवाळी पार्टी

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here