आज दिवाली पाडव्या निमित्त कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात म्हैशींच्या सौंदर्य स्पर्धा भरवण्यात आल्या. दरवर्षी या ठिकाणी ‘फॅशन शो’ या नावाने या स्पर्धांचे आयोजन केले जाते. आजही या स्पर्धेची परंपरा जपल्याचे चित्र पाहायला मिळाले. या अनोख्या ‘फॅशन शो’ छायाचित्र टिपले आहेत, ‘सकाळ’चे छायाचित्रकार ‘नितीन जाधव’ यांनी…

आज दिवाली पाडव्या निमित्त कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात म्हैशींच्या सौंदर्य स्पर्धा भरवण्यात आल्या.
दरवर्षी या ठिकाणी ‘फॅशन शो’ या नावाने या स्पर्धांचे आयोजन केले जाते.
कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात मागील बरीच वर्ष ही परंपरा अखंड सुरु आहे. आजही या स्पर्धेची परंपरा जपल्याचे चित्र पाहायला मिळाले.
स्पर्धेदरम्यान म्हशींना दुचाकीच्या मागून पळवले जाते. हा या स्पर्धेचा एक चित्तथराराक घटक मानला जातो.
यावेळी कसबा बावडासह परिसरातील शेतकऱ्यांनी येथे म्हशींसोबत हजेरी लावली होती.
म्हशी पळवण्याच्या स्पर्धांचा थरारक खेळ पाहण्यासाठी कोल्हापूर शहरासह परिसरातील हजारो नागरिक उपस्थित असतात.
यानिमित्त शेतकरी आपल्याकडील पशुधनाच्या श्रीमंतीचे दर्शन करतो.
वर्षभर या म्हशी दूध देतात त्याच्या जीवावर अनेकांची घरे चालतात. त्याच म्हशींचे कौतुक करण्यासाठी ही स्पर्धा भरवली जाते.
यावेळी म्हशींना सजवून त्यांची मिरवणूक काढण्यात येते. अगदी डौलात मोरपिसांनी नटलेली शिंगे, धुवून चकचकीत करुन या म्हशींचा ‘फॅशन शो’चे आयोजन केले जाते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here