देवदैठण (जि. अहमदनगर): श्रीगोंदे तालुक्यात गुरुवारी मुसळधार पावसाने अचानक हजेरी लावली, यामध्ये शेतीसह विटभट्ट्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. एकीकडे दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसह विट उत्पादकांना अवकाळी आलेल्या पावसामुळे मोठा फटका बसला आहे.
पावसामुळे मेहनत पाण्यात
दसरा झाला की वीटभट्टी व्यवसायास सुरुवात होते. या वर्षी मातीच्या विटेला चांगला बाजार भाव मिळाला. परंतु गेल्या वर्षी कोरोना (Corona) संकटामुळे विट उत्पादन अल्प प्रमाणात झाले होते. या मुळे माठ, गव्हणेवाडी, दानेवाडी, राजापूर या परिसरात चारशेच्या वर विटभट्ट्या आहेत. या वर्षी लवकरच विटभट्ट्या सुरू झाल्या होत्या. सध्या महागाईमुळे विटा बनवणाऱ्या मजुरांची मजुरी दुप्पट झाली आहे. वीटभट्टीसाठी लागणारा कच्चा मालाचे दर दुप्पट झाले आहे. झालेल्या पावसाने मजुरांची मेहनत पुर्णपणे वाया गेली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे विटा झाकण्यासाठी कुठलेही साधन उपलब्ध नव्हते. विट व्यवसाय करताना शासनाची कर भरून माती घ्यावी लागते. मात्र विट उत्पादकांना कुठलीही नुकसान भरपाई मिळत नाही. या मुळे झालेले नुकसान हे मालकांना सहन करावे लागते.

अचानक आलेल्या पावसामुळे मजुरांची मेहनत पुर्णपणे वाया गेली आहे.
हेही वाचा: आमदार नीलेश लंकेंच्या वकृत्वावर तरूणाई फिदा!
या सीझनमध्ये वीटभट्टी मालकांची अग्नीपरीक्षा
”गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी राख आणि कोळसा यांचे बाजारभाव दुप्पट झाले आहेत. एक विट बनविण्यासाठी सात ते आठ रुपये खर्च येतो. वाढती महागाई आणि अवकाळी पावसामुळे विट उत्पादक दुहेरी संकटात आहे.” – उमेश घेगडे, विट निर्माते
विमा कंपनीने पुढाकार घेऊन विट व्यवसायांचे विमे काढावेत. अनेक संकटांवर संकटे हे विट उत्पादकांवर येतात. उचल दिल्याशिवाय मजूर येत नाही. या मध्ये अनेकांची फसवणूक होते. प्रसंगी नातेवाईक, पतसंस्था, बँक यांचेकडून अर्थसहाय्य घेऊन व्यवसाय उभे केले जातात. अनेक आपात्कालीन संकटात कुठलीही मदत यांना मिळत नाही. विमा कंपनीने पुढाकार घ्यावा अशी मागणी आहे.” – गीतांजली पाडळे, प.स.सभापती श्रीगोंदे
हेही वाचा: Nashik | विवाहित नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Esakal