जगभरात फिरण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत, जिथे जाऊन तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करू शकता. तेथील पर्वत, बीच आणि वाळवंटात फिरण्याचा आनंद लुटू शकता. भारतातही अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्हाला परदेशात असल्याचा फील घेता येईल. पण भारतासह जगात अशी काही ठिकाणे आहेत जी तशी पर्यटन स्थळं आहेत, परंतु ही ठिकाणे अत्यंत धोकादायक आहेत. त्यामुळेच लोक या ठिकाणांना भेट देण्यास टाळाटाळ करतात. अमेरिकेच्या डेथ व्हॅलीचे नाव तुम्ही ऐकले असेलच. या ठिकाणी 14 तासांपेक्षा जास्त पाणी प्यायल्याशिवाय राहू शकत नाही, असे म्हणतात. जाणून घ्या, अशाच जगातील सर्वात धोकादायक ठिकाणांबद्दल.

जगातील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एक असलेले दनाकिल डिप्रेशन इथिओपियाच्या अफाट प्रदेशात आहे. त्याचा काही भाग इरिट्रियातही आहे. या ठिकाणी वितळलेला लाव्हा पसरलेला आहे. हे ठिकाण अतिशय धोकादायक आहे कारण येथे अनेक ज्वालामुखी आहेत, जे ज्वलंत आहेत.

सुमारे 1917 मीटर उंचीवर असलेल्या माउंट वॉशिंग्टनवर ताशी 327 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. येथे तापमान उणे 40 अंशांवर पोहोचते.

हे जगातील सर्वात धोकादायक ठिकाणांपैकी एक आहे. टांझानियातील नॅट्रॉन सरोवरात पर्यटकांना पोहण्यास मनाई आहे.

बोलिव्हियामधील अमेझॉन नदीचे खोऱ्यात वसलेले ठिकाण दिसायला खूप सुंदर दिसत असले तरी प्रत्यक्षात हे ठिकाण अतिशय धोकादायक आहे. जगातील सर्वात विषारी प्राणी येथे राहतात. येथे काही झाडे आणि वनस्पती आहेत ज्यांच्या संपर्कात आल्यावर तीव्र खाज येऊ शकते.
Esakal