दिवाळीच्या दरम्यान सुट्ट्या घेण्याचा अनेकांचा विचार असतो. अनेकजण कुटूंबासह फिरायला प्राधान्य देतात. तर काहींना एकटं फिरायला जाण्याचा मोह होतो. अशी सोलो ट्रीप करायची असेल तर अशा परफेक्ट जागा कोणत्या आहेत, याचा शोध तुम्ही आतापर्यंत घेतला असेलच. पण जाताना पॅकिंग नीट करा, दिवाळीचा फराळ सोबत ठेवा. पैसे कसे खर्च करायचे याचे प्लॅनिग व्यवस्थित करा. तसेच आणखीही काही गोष्टी अगदी लक्षात ठेवा. त्यामुळे तुमची सोलो ट्रीप यशस्वी होईल. भविष्यातही तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकेल.

योग्य बजेट ठरवा – तुम्ही जिथे जाल ती जागा सुरक्षित असली पाहिजे, या दृष्टीने विचार करून सुरक्षित ठिकाणी हॉटेलचे बुकींग करा. तुम्ही साधारण खर्च किती होईस, याचे बजेट तयार करा, राहण्याचा, प्रवासाचा, हॉटेलचा, इतर छोट्या-मोठया वस्तुंसाठी साधारण किती पैसे खर्च करू शकता त्याप्रमाणे पैसे सोपत घ्या. खर्च झाल्यावर नोंद करा. तसेच सगळी बुकींग आघीच करून ठेवा, म्हणजे प्रवासादरम्यान अडचणी येणार नाहीत

बॅग पॅकिंगवर पर्यटन टिपा
असे करा पॅकींग- पॅकींग सुरू करण्यापूर्वी ज्या वस्तूंची आवश्यकता आहे त्यांची .यादी करा. तुम्ही जीथे जाल तिथे काहीतरी खरेदी नक्कीच कराल, त्यामुळे तुमच्या बॅगमध्ये यासाठी थोडी जागा ठेवा. तुम्ही सामान जितके मोजके घ्याल तितके बॅगेचे वजन कमी असेल. त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. पण पॉवर बॅंक, मेडिकल कीट, प्लास्टिक पिशव्या मात्र नक्की घ्या. सहलीचे आवश्यक माहिती बघण्यासाठी तुम्ही ट्रॅव्हल जर्नल सोबत ठेवा,

प्रवास
सावध राहा- तुम्हाला भेट द्यायची असलेली ठिकाणे निवडताना तुम्ही सजग असणे आवश्यक आहे. तसेच जिथे जाल तिथे रात्री उशीरा पोहोचण्यापेक्षा दिवसा उजेडी पोहोचा. तुम्हाला तुमच्या सहलीचे नियोजन करण्यासाठी कोणावर तरी अवलंबून राहण्याची गरज नाही तुम्ही स्वत सगळे ठरवणार आणि त्याप्रमाणे वागणार आहात. त्यामुळे योग्य नियोजन करा,

प्रवास
प्रवासाचे ठिकाण निवडताना- दिवाळीनंतर प्रवासाला जाणार आहात म्हणजे ठिकाण ठरवून झाले असेलच, पण असे ठरवाताना काही गोष्टी लक्षात घ्या. ज्या ठिकाणी तुम्हाला मनापासून जावेसे वाटते, तीच जागा निवडा. आधी प्रवासाला कमी वेळ लागेल असे अंतर निवडा. तुमचा आत्मविश्वास वाढल्यावर मग तुम्ही आणखी प्रवास करता येईल अशी मोठी जागा निवडू शकता, ट्रॅव्हल जर्नल ठेवा आणि तुम्हाला ज्या ठिकाणी प्रवास करायचा आहे त्याबद्दलचा डेटा सतत सोबत ठेवा. त्यात तुम्हाला कळलेली नवी माहिती जमा करा.
Esakal