भारतीय संघ सध्या टी२० विश्वचषक स्पर्धा २०२१मध्ये खेळत आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघांनी पराभूत केल्यामुळे भारतीय फॅन्स काहीसे निराश होते. पण अफगाणिस्तानवर भारताने मोठा विजय मिळवला आणि चाहत्यांनी पुन्हा टीम इंडियाचा जयघोष केला. ही स्पर्धा संपली की न्यूझीलंडचा संघ भारतात येणार आहे. तशातच भारतीय चाहत्यांसाठी खुशखबर म्हणजे भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या तारखादेखील जाहीर झाल्या आहेत.
हेही वाचा: T20 WC मध्ये टीम इंडियावर आलीये मुंबई इंडियन्ससारखी वेळ!
भारतीय संघ दक्षिण आफ्रिकामध्ये डिसेंबरच्या अखेरीस जाणार आहे. १७ ते २१ डिसेंबर दरम्यान जोहान्सबर्गच्या मैदानावरील कसोटीने मालिकेची सुरूवात होईल. त्यानंतर २६ ते ३० डिसेंबर दरम्यान प्रिटोरिया येथे बॉक्सिंग डे कसोटी सामना रंगेल. तर तिसरा आणि अखेरचा कसोटी सामना केप टाऊन येथे खेळला जाणार आहे. कसोटी मालिकेनंतर लगेचच वन डे आणि टी२० मालिकादेखील खेळवण्यात येणार आहे. ११ ते १६ जानेवारी दरम्यान भारत-आफ्रिका यांच्यात ३ वन डे सामन्यांची मालिका रंगणार आहे. तर १९ ते २६ जानेवारी या कालावधीत ४ टी२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया
हेही वाचा: IND vs NZ: “हा विराटने रोहितचा केलेला अपमान”; गावसकर भडकले…
-
१७ ते २१ डिसेंबर – पहिली कसोटी – वँडरर्स, जोहान्सबर्ग
-
१६ ते ३० डिसेंबर – दुसरी कसोटी – सेंच्युरियन पार्क, प्रिटोरिया
-
३ ते ७ जानेवारी – तिसरी कसोटी – न्यूलँड्स, केप टाऊन
————————————————– —————–
-
११ जानेवारी – पहिली वन डे – बोलंड पार्क, पार्ल
-
१४ जानेवारी – दुसरी वन डे – न्यूलँड्स, केप टाऊन
-
१६ जानेवारी – तिसरी वन डे – न्यूलँड्स, केप टाऊन
————————————————– —————–
-
१९ जानेवारी – पहिली टी२० – न्यूलँड्स, केप टाऊन
-
२१ जानेवारी – दुसरी टी२० – न्यूलँड्स, केप टाऊन
-
२३ जानेवारी – तिसरी टी२० – बोलंड पार्क, पार्ल
-
२६ जानेवारी – चौथी टी२० – बोलंड पार्क, पार्ल
Esakal