माजी विश्वसुंदरी आणि बॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री ऐश्वर्या राय ही नेहमीच चाहत्यांच्या चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. सध्या तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. त्यावरुन तिचा नेटकऱ्यांनी क्लास घेतला आहे. तिला वेगवेगळ्या कमेंट देऊन हैराण केले आहे. त्यांच्या मते ऐश्वर्या राय ही प्रेग्नंट आहे. यावर काहींनी तिला ओव्हर अॅक्टिंग न करण्याचा सल्ला दिला आहे.

काही दिवसांपूर्वी जगातील प्रसिद्ध अशा फॅशन शो मध्ये ऐश्वर्या सहभागी झाली होती. त्यामधील तिच्या लूकला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
दिवाळीच्या निमित्तानं ऐश्वर्यानं आपला वेळ कुटूंबियांसाठी दिला आहे. दिवाळीनिमित्तानं बाहेर फिरतानाचे तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
ऐश्वर्या राय ही प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या पोन्नियन सेल्वन चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये बिझी असल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान ऐश्वर्याकडे गुड न्युज आहे अशाही काही बातम्या व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.
सध्या तिचा एअरपोर्टवरील व्हि़डिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये ती पती अभिषेक आणि मुलगी आराध्या यांच्या समवेत दिसते आहे. यावेळी तिनं आराध्याचा हात पकडला आहे.

आराध्याचा ऐश्वर्याचा हात पकड़णं हे नेटकऱ्यांना विशेष वाटल्यानं त्यांनी तिला गुड न्यूजच्या नावाखाली ट्रोल करायला सुरुवात केली आहे.Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here