
दिवाळी होऊन दोन दिवस झाले आहेत; पण या सणाची चाहूल अद्याप संपताना दिसत नाहीय.

बॉलिवूड सेलिब्रिटी अजूनही दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर करताहेत. अभिनेत्री भूमी पेडणेकरनंही काही फोटो शेअर केले आहेत.

भूमी पेडणेकरनं दिवाळीनिमित्त गुलाबी रंगाच्या लेहंग्यावर चोळी परिधान केलीय. तिच्या लेहंग्यावर अप्रतिम नक्षी असून त्यात ती खूपच सुंदर दिसतेय.

या लेहंग्यावरचा फोटो शेअर करताना भूमीनं चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

भूमीनं एका फोटोत तिच्या पाठीचा ‘तीळ’ही चाहत्यांना दाखवलाय. त्याला तिन भन्नाट कॅप्शनही दिलंय.

भूमीनं पाठीवर तीळ असलेला फोटो शेअर करत लिहिलंय, दिल आणि तीळ.. हा हॅशटॅग देत हॅपी दिवाळी असं म्हंटलंय.

भूमी पेडणेकर ही मेकअप आणि स्किनकेअर आयकॉन आहे. ती सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह पहायला मिळते.
Esakal