नागपूर : निरोगी व हेल्दी जीवन जगण्यासाठी डोळे निरोगी असणे खूप महत्त्वाचे आहे. मोबाईल आणि लॅपटॉपच्या वाढत्या वापरामुळे डोळे पूर्वीपेक्षा जास्त थकतात किंवा त्यांचा दिवसभरात भरपूर वापर होत आहे. यामुळे लोकांमध्ये डोकेदुखी, सूज, जळजळ आणि डोळ्यांवर ताण येण्याची प्रकरणे वाढली आहेत.
दररोज सकाळी शौचालयास जाण्यापूर्वी किंवा जाऊन आल्यानंतर तोंडात पाणी भरा आणि काही सेकंद हे असेच तोंडात धरून ठेवा. या दरम्यान तुमचे डोळे बंद असले पाहिजे. आता या पाण्याच्या गुळण्या करा आणि ही प्रक्रिया दोन ते तीन वेळा रिपीट करा.त्रिफळा पाण्याने डोळे धुणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. हे केवळ दृष्टीच वाढवत नाही तर डोळ्यांची चमकही सुधारते. विशेषत: थकलेल्या डोळ्यांना विश्रांती देण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग आहे.त्राटक षटकर्म हा डोळ्यांचा एक साधासोपा व्यायाम आहे, ज्यामध्ये एखाद्या वस्तूवर काही काळ डोळे किंवा नजर स्थिर ठेवून एकटक पाहायचे असते.