सिडणी : महान फिरकीपटू शेन वॉर्न आणि वाद हे काही नवीन नाही. मैदानात आपल्या गोलंदाजीने नेहमी चर्चेत राहणारा वॉर्न निवृत्तीनंतरही नेहमी चर्चेत असतो. तो गोलंदाजीमुळे नव्हे तर आपल्या मुलींमुळे… काही ना काही वाद उफाळत असल्याने त्याच्यावर नेहमी आरोप होतात. आता एका मॉडेलने त्याच्यावर अश्लील मेसेच पाठवण्याचा आणि हॉटेलमध्ये बोलावल्याचा आरोप केला आहे. यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री जेसिका पॉवरने ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू व माजी क्रिकेटर शेन वॉर्नवर अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर ५२ वर्षीय वॉर्नच्या अशा कृत्यासाठी जेसिकाने ‘न्यूरोटिक’ म्हटले आहे. तिने शेन वॉर्ननने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये वॉर्न जेसिकाला हॉटेलच्या खोलीत भेटण्यास बोलावत असल्याचे दिसत आहे. वॉर्नविरोधात महिलेने तक्रार करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही वॉर्न वादात सापडला आहे, त्यामुळे त्याचे लग्न मोडले आहे.
हेही वाचा: नवीन नट्टू काका प्रेक्षकांच्या भेटीला! फोटो होतोय व्हायरल
शेन वॉर्नने तिला मेसेज केला होता. ज्यामध्ये तो हॉटेलच्या खोलीत भेटण्याविषयी सांगत होता. मात्र, तिने वॉर्नला भेटण्यास नकार दिला. नकार देऊनही वॉर्नने तिला भेटण्यासाठी अनेक मेसेज केले. ‘हा वेडेपणा आहे. तू पुन्हा मला मेसेज करू शकतो यावर माझा विश्वास बसत नाही’ असे तिने म्हटले. मॉडेल जेसिकाने एका इंग्रजी रिॲलिटी शोमध्ये शेन वॉर्नवर हा आरोप केला आहे.

मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर केले
३० वर्षीय जेसिका पॉवरने शेव वॉर्नवर गंभीर आरोप करताना मेसेजचे स्क्रीनशॉट शेअर केले. यामुळे वॉनचे ह कृत्य जगासमोर आले आहे. यापूर्वीही वॉर्नवर अनेक महिलांनी अत्याचाराचे आरोप केले आहे. यामुळे वॉर्न नेहमी चर्चेत राहतो. त्याचे एकप्रकारे वादाशी नातेच जुळले आहे. आता वॉर्न काय प्रतिक्रिया देतो हेच पाहणे बाकी आहे.
Esakal