बेळगाव : वर्षातील सर्वात मोठा सण असणाऱ्या दिवाळीमध्ये पाडव्या दिवशी म्हैस पळवण्याची परंपरा गेल्या दोनशे वर्षांपासून शहरातील गवळी समाजाने कायम ठेवली असून, काही वर्षांपूर्वी फक्त गवळी समाजापुरतीच मर्यादित असणारी म्हैस पळविण्याची परंपरा आता शहराच्या विविध भागातील शेतकरी वर्गही जपू लागला आहे. त्यामुळे शुक्रवारी अनेक ठिकाणी विविध प्रकारे सजविण्यात आलेल्या म्हशी पळवण्याच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात पार पडल्या. तसेच म्हैस पळविण्याची परंपरा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेळगाव शहराच्या विविध भागात शेतकरी मोठ्या संख्येने राहतात. यापैकी अनेक शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती बरोबरच जनावरे पाळण्याचा देखील आहे. मात्र पाडव्या दिवशी म्हशींना आंघोळ घालून सजवून म्हैस पळविण्याची परंपरा अनेक वर्षे गवळी समाजाने कायम ठेवली आहे.

पाडव्यादिवशी म्हशींना आंघोळ घालून, सजवून म्हैस पळविण्याची परंपरा अनेक वर्षे गवळी समाजाने कायम ठेवली आहे.

पाडव्यादिवशी म्हशींना आंघोळ घालून, सजवून म्हैस पळविण्याची परंपरा अनेक वर्षे गवळी समाजाने कायम ठेवली आहे.

पाडव्या दिवशी म्हशींना आंघोळ घालून त्यांची विधिवत पूजा केली जाते. तसेच त्यांना विविध प्रकारचे कपडे आणि अलंकार घालून सजविले जाते. त्यानंतर सायंकाळी पाच वाजल्यानंतर म्हैस पळविण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला जातो. यावेळी अहिर गवळी समाज मंगळवार पेठ, नानावाडी, कॅम्प गवळी गल्ली, कोनवाळ गल्ली, गवळी गल्ली, वडगाव, चव्हाट गल्ली, आनंदवाडी, कोरे गल्ली शहापुर आदी भागातील गवळी बांधव व शेतकरी यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहराच्या इतर भागातील शेतकरी व गवळी बांधव देखील यामध्ये सहभागी होतात.

शहराच्या इतर भागातील शेतकरी व गवळी बांधव देखील यामध्ये सहभागी होतात.

म्हैस पळवण्याची परंपरा अनेक वर्षांपासून आहे. अहिर गवळी समाज आपल्या परंपरेप्रमाणे म्हैस पळवितो. शहराच्या इतर भागातील शेतकरी व गवळी बांधव देखील यामध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे अलीकडच्या काही वर्षात म्हैस पळविण्याचे कार्यक्रम वाढू लागले आहेत.

सुरज गवळी, मंगळवार पेठ, टिळकवाडी

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here