पाली : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (ता.5) शनिवारी (ता.6) सायंकाळी जोरदार वारा व विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस कोसळला. ऐन दिवाळीत परतीच्या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र धुडगूस घातला आहे. त्यामुळे झोडणीसाठी तयार भात भिजल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. याबरोबरच दिवाळीच्या आनंदावर देखील विरजण पडले आहे.

हेही वाचा: अहमदनगर : १५ मिनिटे, अग्नितांडव आणि १० बळी, वाचा नेमकं काय घडलं?

सध्या शेतकऱ्यांनी भाताची कापणी केली असून मळणी व झोडणीची प्रक्रिया सुरू आहे. मात्र अचानक आलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्याची तारांबळ उडाली आहे. धान्याचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गळून पडला आहे. त्यामुळे बळीराजा हताश झाला आहे. कृषी विभागाकडे अजून नुकसानीची आकडेवारी आलेली नाही.

सुधागड तालुक्यातील उद्धर येथील तरुण शेतकरी तुषार केळकर यांनी सांगितले की भात कापून झोडणीसाठी चांगल्या प्रकारे रचून ठेवला होता. मात्र जोरदार व मुसळधार पावसामुळे भात भिजला आहे. त्यामुळे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील केळकर यांनी केली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here