आजकाल प्रत्येकाला स्टायलिश दिसावेसे वाटते. ज्यासाठी ते लेटेस्ट फॅशन ट्रेंड फॉलो करतात. मात्र, कोणताही ट्रेंड फॉलो करण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही तुमचा बॉडी टाइप, स्कीन टोन आणि हाइट अशा अनेक गोष्टींचा विचार केला पाहिजे. आज आपण त्या फॅशन ट्रेंडबद्दल बोलणार आहोत जे कमी हाइटच्या मुलींना चांगले दिसत नाहीत. कारण असे काही फॅशन ट्रेंड्स आहेत जे फॉलो केल्याने तुमची हाइट कमी दिसते. तुम्ही या फॅशन ट्रेंड्स फॉलो करणे टाळले पाहिजे, चला जाणून घेऊया ते लेटेस्ट फॅशन ट्रेंड काय आहेत.

मिडी लेंथ स्कर्ट:
स्कर्टसोबत टॉप किंवा शर्ट दोन्हीचे कॉम्बिनेशन छान दिसते. पण शार्ट हाइटच्या लोकांनी लॉंग मिडी लेंथ स्कर्ट घालणे अवॉइड (टाळावेत) करावे. असे वापरल्याने पाय खूपच लहान दिसतात. जर तुम्हाला स्कर्ट घालायला आवडत असतील तर तुम्ही शॉर्ट स्कर्ट लेंथ घालू शकता. नेहमी गुडघ्याखाली स्कर्ट घालणे टाळा.
ओवरसाइज बॅग:
आजकाल अशा बॅगची मागणी खूप आहे. नक्कीच ते खूप चांगले दिसतात. जरी त्यामुळे शरीर लहान दिसतात. ज्यांची उंची कमी आहे त्यांनी मोठ्या आकाराच्या बॅगऐवजी मध्यम आकाराची बॅग निवडणे उत्तमच.
ओवरसाइज जीन्स:
ओवरसाइज जीन्सला महिलांची पसंती असते. काही स्त्रिया अगदी स्ट्रीट लूकमध्येही ते फॉलो करतात, परंतु जर तुमची उंची कमी असेल तर तुम्ही ओव्हरसाईज जीन्स घालणे टाळावे. पण जर तुम्हाला स्ट्रीट लूक फ्लॉंट करायचा असेल तर तुम्ही स्ट्रटर्ज बॉयफ्रेंड जीन्स घालू शकता. कोणत्याही फिट केलेल्या टॉपसह ते वापरु शकता.
राउंड टो हिल्स:
राउंड टो हिल्स खूप चांगले दिसतात. अशा प्रकारच्या हिल्समुळे पाय लहान दिसतात. जर तुमची उंची कमी असेल तर तुम्ही अशा प्रकारची हिल्स घालू नका, त्याऐवजी तुम्ही प्वाइंटेड टो हिल्स घालू शकता. स्टायलिश दिसण्यासोबतच ते पायही लांब करतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here