दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तिने करिअरची सुरुवात मॉडलिंगने केली. अनुष्काने ‘सुपर’ या तेलुगू चित्रपटातून पदार्पण केलं होतं. ‘बाहुबली’मध्ये तिने साकारलेली देवसेना प्रेक्षकांना फार आवडली होती.

२००५ मध्ये अनुष्काने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं.
अनुष्काचं नाव स्वीटी शेट्टी असून तिने इंडस्ट्रीत आल्यानंतर स्वीटी नाव बदलून अनुष्का असं ठेवलं.
अनुष्का ही दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या यादीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांपैकी एक अभिनेत्री आहे.
चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अनुष्का योग प्रशिक्षक होती.
अनुष्काने नागार्जुन, रजनीकांत, चिरंजीवी, रवी तेजा अशा बड्या कलाकांरासोबत काम केलं.
अनुष्काचं नाव ‘बाहुबली’ फेम प्रभासशी जोडलं गेलं. मात्र आम्ही फक्त मित्र आहोत, असं दोघांनी स्पष्ट केलं. त्यानंतर ती एका क्रिकेटरला डेट करत असल्याचं म्हटलं जात होतं.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here