गेल्या वर्षभरापासून रोहित शेट्टी Rohit Shetty दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ Sooryavanshi या चित्रपटाची प्रतीक्षा चाहते करत होते. कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच ५ नोव्हेंबर रोजी हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. प्रदर्शनाच्या दिवशी या बिग बजेट चित्रपटाने २६.२९ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. विशेष म्हणजे अवघ्या २४ तासांत या चित्रपटाचे सात लाखांहून अधिक तिकिट विकले गेले आहेत.

‘बुक माय शो’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचे एका सेकंदाला १७ तिकिटं विकली गेली आहेत. यावर रोहित शेट्टीनेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग लिहित रोहित शेट्टीने प्रेक्षकांचे आभार मानले. ‘डोंट अंडररेस्टिमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन’, असं त्याने लिहिलं.

हेही वाचा: ‘तुम्ही धुण्याभांड्याचे तरी काम देणार का?,’ ‘फँड्री’मधल्या ‘शालू’ची पोस्ट चर्चेत

५ नोव्हेंबर रोजी सूर्यवंशीचे एका सेकंदाला १७ तिकिटं विकली गेली. तर २४ तासांत सात लाखांहून अधिक तिकिटं विकली गेली, असं ‘बुक माय शो’ने ट्विटमध्ये लिहिलं आहे. प्रेक्षक-समीक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय. अक्षय कुमार, कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात अजय देवगण आणि रणवीर सिंग हे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here