Harbhajan Singh T20I Playing XI : टी२० विश्वचषक स्पर्धेत अ गटातून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोघांना सेमीफायनलचं तिकीट मिळालं आहे. ब गटातून पाकिस्तानचा संघ सेमीफायनलला पोहोचला आहे. अफगाणिस्तान-न्यूझीलंड सामन्यावर भारताच्या आशा टिकून आहेत. भारताच्या खेळाडूंनी पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन तुल्यबळ संघांविरोधात खूपच निराशाजनक कामगिरी केली. त्यानंतर अफगाणिस्तान आणि स्कॉटलंड या संघांना मात्र चांगलाच चोप दिला. या दरम्यान, भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग याने त्याचा आवडीचा टी२० संघ निवडला असून त्यात विराटला स्थान देण्यात आलेले नाही.

हेही वाचा: T20 WC मध्ये टीम इंडियावर आलीये मुंबई इंडियन्ससारखी वेळ!

हरभजन-सिंग

हरभजन-सिंग

हरभजनने सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि ख्रिस गेल या दोन तडाखेबाज फलंदाजांनी निवड केली. या दोघांनंतर मधल्या फळीत हरभजनने जॉस बटलर, शेन वॉटसन आणि एबी डिव्हिलियर्स यांना स्थान दिले आहे. विराट कोहलीला संघात स्थान नसले तरी संघाचे नेतृत्व मात्र भारतीय कर्णधाराकडेच आहे. भारताचा महेंद्रसिंग धोनी याला हरभजनने संघाचा यष्टीरक्षक आणि कर्णधार म्हणून निवडलं आहे. अष्टपैलूंच्या याजीत ड्वेन ब्राव्हो आणि कायरन पोलार्ड या विंडिजच्या खेळाडूंना स्थान दिलं आहे. तर फिरकीपटूंच्या यादीतही विंडिजच्या सुनील नारायणला संधी देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाजीसाठी लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह या दोघांना संधात समाविष्ट केलं गेलं आहे.

हेही वाचा: अफगाणिस्तान-न्यूझीलंड सामना; टीम इंडियाबद्दलचे मीम्स व्हायरल

रोहित शर्मा, ख्रिस गेल, जॉस बटलर, शेन वॉटसन, एबी डिव्हिलियर्स, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), ड्वेन ब्राव्हो, कायरन पोलार्ड, सुनील नारायण, लसिथ मलिंगा, जसप्रीत बुमराह.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here