प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळी असते, वेगळी दिसते. मग त्या व्यक्तीचा रंग, रुप, उंची, तब्येत कशीही असली तरीही त्या व्यक्तीला स्वत:चे वेगळे असे अस्तित्व असते. कोणत्याही व्यक्तीला त्याच्या दिसण्यावरून, त्याच्या कपड्यांवरून परखणे(Appearances) नैतिकतेनुसार चुकीचे आहे तरीही आजही आपल्याकडे लोकांना दिसण्यावरून(Looks) परखले जाते. आजही आपण पाहतो की, न्युजपेपरमधील जाहिरातीमध्ये अजूनही उंच, गोरा इ. असे शब्द वाचायला मिळतात आणि ऑनलाईन जाहिरातीमध्ये (Online Avvertisment)देखील ते अनावश्यकपणे दाखवले जात आहे. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार मॅट्रिमोनियल साईटवर (Matrimonial site) प्रोफाईल (Profile) निवडताना अजूनही भारतीय लोक दिसण्याला प्राधान्य देतात. (Survey Majority young Indians still consider looks first On a matrimonial profile)

हेही वाचा: भारतातील 10 रोमांचक ट्रेक, नोव्हेंबरमध्ये फ्रेंन्डसोबत करा धम्माल

Betterhalf.ai या संस्थेने केलेल्या सर्व्हेमधून समोर आलेल्या माहितीनुसार, संशोधनामध्ये सहभाही 286 लोकांपैकी 43 टक्के अविवाहित भारतीयांसाठी मॅट्रिमोनियल साईटवर प्रोफाईल निवडताना Looks हा पहिले प्राधान्य देतात. ‘materialistic approach’ म्हणून प्रोफाईलची निवड केली जात असली तरी संबधित व्यक्तीमध्ये आणखी रुची दाखविण्यासाठी अविवाहित भारतीय अजूनही व्यक्ती कसा दिसतो, काय कपडे वापरतो याला महत्त्व देतात. तसेच 22 टक्के लोक त्यांच्या वयाच्या व्यक्तींचे प्रोफाईल निवडतात, तर 19 टक्के लोक व्यक्तीचे प्रोफेशन काय आहे हे पाहून प्रोफाईलची निवड करतात आणि 16 टक्के लोक संभाव्य जोडीदाराची आधी सॅलरी काय आहे हे देखील पाहतात.

Betterhalf.ai च्या सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेतील पवन गुप्ता सांगतात की संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, ”ऑनलाईन मॅच-मेकींग प्रोफाईलवर अकाऊंट ओपन करणे तसे अवघड आहे. जेव्हा Looks चा विचार केला जातो तेव्हा फक्त व्यक्ती कसा दिसतो एवढेच नाही तर त्यानी प्रोफाईल फोटो कसा लावला आहे, त्याची फोटो क्वालिटी कशी आहे हे बघतात. जितकेच वेगवेगळे फोटो असतील तितके प्रोफाईल आणखी रंजक आणि विश्वासार्ह होईल.”

हेही वाचा: ३० वर्ष महिलेला परफेक्ट पार्टनर मिळालाच नाही, तरीही झाली प्रेग्नंट

वैवाहिक प्रोफाइल

वैवाहिक प्रोफाइल

”जोडीदार शोधण्याच्या प्रक्रियेदरम्यान, एखाद्या प्रोफाईलमध्ये स्वारस्य(Interest) दाखविण्यापूर्वी लोक जसा वंश, धर्म, समुदाय आणि संस्कृती इतर पारंपारिक निकषांचा विचार करतात त्याचप्रमाणे व्यक्तीचे प्रोफेशन आणि त्यांची सॅलरी या दोन गोष्टी देखील पाहतात.” असेही त्यांनी सांगितले.

सर्वेक्षणानुसार 58 लोक या निकषांना प्राधान्य देत नाही तर 42 टक्के लोक या निकषांना प्राधान्य देतात. समोर आलेल्या माहितीवरून देशातील जाती, वय आणि धर्मावरुन निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर प्रकाश टाकतो. शहरात राहणाऱ्या भारतीयांची की मानसिकतेमध्ये हळू हळू बदल होत असून पारंपारिक मॅचमेकींग कालबाह्य होत असून एकमेकांशी जुळवून घेण्याची क्षमता पाहून जोडीदार निवडण्याच्या नव्या मॅचमेेकींग पध्दतीकडे वळत आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here