अन्न चावून खाण्यापासून ते बोलताना योग्य उच्चारासाठी मदत करण्यापर्यंत आपले दात (Teeth) आपल्या रोजच्या जीवनामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. तुम्हाला माहितीये का? दात हा शरीरातील असा अवयव आहे की ज्यामध्ये स्वत:ला बरे करण्याची क्षमता आहे. त्यासाठी मौखिक आरोग्याकडे (oral health) विशेष लक्ष देण्याची गरज आहे. फक्त ब्रश (Bursh) करून दातांचे आरोग्या जपले जाते हा गैरसमज आहे. मजबूत आणि निरागी दातांसाठी मौखिक आरोग्याचे रुटीन आखणे गरजेचे आहे. दात हे मानवी शरीरातील अविभाज्य घटक आहेत त्यामुळे त्यांच्यावर विविध घटकांचा परिणाम होत असतो.

या सवयींमुळे तुमचे दात होतील खराब (Teeth damaging habits)

दातांनी ही कामे करू नका

: तुम्ही दाताने पॅकेटस् फोडता, बॉटलचे झाकण खोलणे आणि इतर गोष्टी करता का? या प्रश्नाचे उत्तर जर हो असेल तर तुम्ही तुमच्या दातांना नुकसान पोहचवत आहात हे तुम्हाला माहितीये का? दातांचा असा साधन(Tool) म्हणून वापर करण्यामुळे दातांना तडा जाऊ शकतो, दाताचा तुकडा पडू शकतो किंवा दात तूटू शकतो. त्यामुळे दातांचा वापर करुन अशी कामे करणे टाळा.

दाताने नखे खाऊ नका :

ताणताणवा किंवा चिंतेमध्ये नखे चावणे ही असमान्य सवय आहे.तज्ज्ञ मतानुसार ही सवय मानसिक आरोग्य विकारांशी संबधित आहे जसे की ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर. दातांनी नखे चावणे ही सवय अस्वच्छ तर आहेत पण त्यामुळे दात खराब होऊ शकतो आणि जबड्यावर देखील परिणाम होऊ शकतो.

दातांनी बर्फ खाणे

: तुम्हाला तुमचे कोल्ड ड्रिंकमधील बर्फ खायला आवडतो का? जर तुम्हाला ही सवय असेल तर ही सवय आता सोडावी लागेल कारण त्यामुळे तुमचे दात खराब होऊ सकतात. बर्फ चावून खाल्यामुळे दातांची सवेंदनशीलता वाढते आणि त्यामुळे दातांच्या नसा आणि पेशींनी नुकसान पोहचू शकते.

जोर जोरात दात घासणे

: दात साफ करताना व्यवस्थित पध्दतीने दात घासणे अत्यंत गरजेचे आहे पण त्याचा अर्थ असा नाही की जोर जोरात घासून दात साफ केले पाहिजे. दातांचे आरोग्य जपण्यासाठी हळूवारपणे आणि मऊ ब्रशने दात घासणे फायदेशीर ठरू शकते. जोरजोराने दात घासल्यामुळे हिरड्यांना नुकासन पोहचते त्यामुळे दात खराब होऊ शकतात.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here