अंड्यामध्ये भरपूर प्रोटीन असते. जगभरामध्ये कित्येकजण ब्रेकफास्टमध्ये अंड खातात पण, लोक आपल्या आवडीनुसार अंड वेगवेगळ्या प्रकारे बनवून खातात. जसे की काही लोकांना उकडलेले अंड खायला आवडते, काही लोकांना अंड्याची भूर्जी खायला आवडते. काही लोकांना ब्रेडसोबत ऑमलेट खायला आवडते. तुम्ही अंड कसे खाता हे महत्त्वाचे नाही पण तुमच्या आहारात अंड्याचा समावेश असणे गरजचेचे आहे. पण काही न्यट्रीशनिस्टचे मत आहे की, तुम्ही अंड कसे बनवता यावर अंडे आरोग्यासाठी कशा प्रकारे फायदेशीर आहे हे ठरते.

अंड्यामध्ये असलेले प्रोटीन तुमच्या शरीरामध्ये जाते की नाही हे तुमच्या रेसिपीवरुन ठरते. डायटीशिअन आणि न्युट्रीशनिस्ट नमामी अग्रवाल यांनी आपल्या इंस्ट्रग्रामवर अंडे कशाप्रकारे खाल्यावर फायदेशीर ठरू शकते हे सांगणारी पोस्ट केली आहे.

नमामी यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे, अंड्यामधील पिवळ्या भागामध्ये सर्वात जास्त पोषक तत्व आहे. पुर्ण अंड म्हणजेच अंड्याचे पांढरा भाग आणि पिवळा भाग दोन्ही एकत्र खाल्यास प्रोटीन, फॅट्स आमि कॅलरींचे योग्य प्रमाणात शरीराला मिळतात. असे अंडे खाल्यास बहूतेक लोकांचे दिर्घकाळासाठी पोट भरते.

अंड्यामध्ये सूपरफुड मानले जाते. हेल्थ एक्सपर्टचे मत आहे की, मॉडर्न डाएटमध्ये ज्यांची कमी असते असे सर्व प्रकारचे पोषक तत्व भरपूर प्रमाणात आहे. एका अंड्यामध्ये व्हिटॅमीम ए 6 टक्के, व्हिटॅमीन B5 मध्ये 7 टक्के, व्हिट्रमीन B12- 9 टक्के , फॉस्फरस 9 – टक्के, व्हिटॅमिन B2-15,सेलेनियम 22 टक्के असते त्यामुळ अंडे बनवताना पिवळा बल्कचा टाकून देऊ नका. अंड्याचा पिवळ्या भागाचा आहारात नक्की सामावेश करा.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here