NZ vs AFG, T20 World Cup: न्यूझीलंडच्या संघाने अफगाणिस्तानविरूद्ध ८ गडी आणि ११ चेंडू राखून विजय मिळवला आणि सेमीफायनलचं तिकीट पक्कं केलं. न्यूझीलंडच्या विजयामुळे अफगाणिस्तान स्पर्धेबाहेर गेलं. त्यासोबतच भारतीय संघाचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. भारताचे सध्या ४ गुण आहेत. आज नामिबियाविरूद्धचा सामना जिंकला, तरीही भारताचे केवळ ६ गुण होतील. पण न्यूझीलंडचे ८ गुण असून भारत त्यांची बरोबरी करू शकत नाही. त्यामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले. या घटनेचे वर्णन करणारा एक गमतीशीर फोटो वासिम जाफरचा ट्वीट केला असून तो फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

हेही वाचा: हरभजनने निवडलेल्या T20 संघात विराट, हार्दिकला जागा नाही!

भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांसाठी महत्त्वाच्या असलेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध कामगिरी केली. अफगाणिस्तानने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकात केवळ १२४ धावांपर्यंत मजल मारली. हजरतुल्लाह झझाई (२), मोहम्मद शहजाद (४) आणि रहमानुल्लाह गुरबाज (६) यांनी निराशा केली. गुलबदीने नईबनेही (१५) वाईट कामगिरी केली. खालच्या फळीतही मोहम्मद नबी (१४), करीम जनत (२), राशिद खान (३) यांना फारशी चांगली खेळी करता आली नाही. पण नजीबुल्लाह झादरानने ६ चौकार आणि ३ षटकार खेचत ४८ चेंडूत ७३ धावा फटकावल्या.

न्युझीलँड

न्युझीलँड

हेही वाचा: T20 WC : सेमी फायनलमधील रंगत दाखवणारी जाफरची ‘धमाल’ मीम्स

या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या संघाने दमदार सुरूवात केली होती. मार्टीन गप्टील (२८) आणि डॅरेल मिचेल (१७) यांनी संयमी सलामी दिली. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसनने सर्वाधिक नाबाद ४० धावा केल्या. त्याला डेवॉन कॉनवेने नाबाद ३६ धावा करत चांगली साथ दिली. या दोघांनी संघाला ८ गडी आणि ११ चेंडू राखून पराभूत केले.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here