हर्णे : सलग सुट्टयांमुळे मिनी महाबळेश्वर समजले जाणाऱ्या दापोलीमध्ये (Dapoli) पर्यटकांनी दिवाळीच्या दुसऱ्या दिवसा पासूनच मोठया संख्येने गर्दी करायला सुरुवात केली आहे . सर्वच बीच पर्यटकांनी बहरू लागले आहेत. हर्णे पाळंदे (Harne Palande)बीचवर देखील पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, नाशिक या भागातील पर्यटक विशेषतः आजही दापोलीला पसंती देतात. गेली दीड वर्ष कोरोनाकाळात सर्वच बंद असल्यामुळे कंटाळलेला पर्यटक अतिउत्साहाने कोकणातच फिरायला येण्यासाठी बाहेर पडला आहे. तसेच मासे खाण्यासाठी आणि खरेदीसाठी तुफान गर्दी झाली आहे.

मुरुड बीचवर पर्यटकांची तुफान गर्दी झाली आहे.
पाळंदे बीचवर या बोटीतून डॉल्फिन सफरसाठी पर्यटक मोठ्या संख्येने जात असतात.
हर्णे बंदरात मच्छी खरेदीसाठी आलेले पर्यटक.
पाळंदे बीचवर जेट्सकी, बलून सफर , आणि डॉल्फिन सफरीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आकर्षक.
मच्छी खरेदी केल्यानंतर मासळी हातात घेऊन फोटो काढण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही.
मुरुड बीचवर पर्यटक बलून वर मजा घेताना.
मासळी खरेदी केल्यानंतर साफ करणाऱ्या मच्छीमार महिलांबरोबर मच्छी साफ करताना स्वतः पर्यटक आनंद मानत होते.
पाळंदे बीचवर जेट्सकी, बलून सफर , आणि डॉल्फिन सफरीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आकर्षक.
मुरुडमध्ये बीचवर जाणार रस्ता ट्रॅफिक जाम झाला होता

Esakal

9 COMMENTS

  1. [url=https://over-the-counter-drug.com/#]where can i buy viagra over the counter[/url] best allergy medications over-the-counter

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here