आईआरसीटीसीने श्री राम भक्तांसाठी स्पेशल भेट दिली आहे. भारतीय रेल्वेने श्री राम भगवान यांच्या आयुष्याशी निगडीत महत्त्वपूर्ण स्थळांना भेट देण्यासाठी एक स्पेशल ऑफर सुरु केली आहे. श्री रामायन यात्रेची पहिली ट्रेन काल ७ नोव्हेंबरला निघाल्याची माहिती इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने शनिवारी दिली. धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी आईआरसीटीसी श्री रामायन यात्रा टुर प्लॅन केली आहे;ज्यामुळे कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावमुळे परिणाम झालेली देशांतर्गत रेल्वे सेवा हळू हळू पूर्वपदावर येईल.

आईआरसीटीसीने हे पॅकेज विशेषत: तीर्थयात्रा करणाऱ्या यात्रेकरूंसाठी त्यांचे बजेटविचारात घेऊन हे खास पॅकेज सुरु केले आहे. त्यासासाठी भारत सरकारच्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत ‘रामायण सर्किट’च्या डिलक्स ट्रेनची सुविधा दिली आहे. ही श्री राम यांच्या जीवनाशी संबधीत सर्व ठिकाणी जसे की, आयोध्या, नंदीग्राम, जनकपूर, सीतामढी, काशी, श्रृंगवरपूर, चित्रकूट, नाशिक, हंपी, आणि रामेश्वरम येथे दर्शनासाठी जाईल.
इतक्या दिवसांचे असेल टुर पॅकेज या डिलक्स ट्रेनमध्ये राहण्याची सुविधा दिली आहे. या पॅकेजमध्ये एकूण १७ दिवसांची यात्रा आहे. या दिवासांमध्ये यात्रेकरुंना श्री राम यांच्या जीवनाशी संबधीत सर्व महत्त्वाच्या ठिकाणी भेट देता येईल.
श्री रामायण यात्रा स्पेशल डिलक्स ट्रेनचे भाडे अशा स्वरूपात आहे
फर्स्ट एसीचे तिकीटाचे भाडे 1,02,095 रुपये प्रती व्यक्ती आहे तर सेकंड एसी तिकिट 82,950 रुपये प्रती व्यक्ती आहे. ट्रेनमध्ये फाईन डायनिंग, रेस्टॉरंट, एक मॉडर्न किटन, अंघोळ करण्यासाठी शॉवर क्युबिकल्स सारख्या कित्येक सुविधा आहेत. एवढेच नाही तर यात्रेकरूंच्या सुरक्षेची देखील पूर्ण काळजी घेतली आहे. सीसीटिव्ही कॅमेऱ्यापासून ते प्रत्येक कोचमध्ये सिक्योरिटी गार्ड देखील आहेत.
या सुविधा मिळणार
या पॅकेजमध्ये यात्रेकरू ट्रेनच्या प्रवासासोबत, एसी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, दिवसाचे जेवन(फक्त व्हेज), ट्रान्सपोर्टेशन, साईट सिईंग देखील मिळणार आहे. यामध्ये ट्रॅव्हल इंश्योरन्सदेखील यात समाविष्ठ आहे. अधिक माहितीसाठी आईआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईला भेट द्या.
Esakal