सोमवारपासून छठपूजेला सुरुवात झाली आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत हा उत्सव चालणार आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाने इंस्टाग्राम अकाऊंटवर छठपूजेसे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

छठपूजेसाठी मोनालिसाने खास लूक कॅरी केला होता. तिने पिवळी साडी नेसली होती. सिंदूर लावण्यासह गळ्यात मंगळसूत्रही दिसत होते. मोनालिसाचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत.
अभिनेत्रीच्या फोटोंना चाहत्यांकडूनही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. जवळपास ४० हजार लोकांनी या फोटोंना लाईक केले आहे.
मोनालिसा केवळ भोजपुरी इंडस्ट्री चित्रपटांमध्येच दिसली नाही तर बिग बॉस १०, नच बलिए, नजर आदी छोट्या पडद्यावरील रिॲलिटी शोमध्येही दिसली आहे.
दिवाळीनिमित्त तिने पारंपरिक ड्रेसमधील तिचा फोटो शेअर केला आहे. हातात दिव्यांनी सजवलेले प्लेट आणि फिकट गुलाबी रंगाच्या साडीत ती दिसली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here