खडकवासला : दिवाळी सुरू असताना शेवटच्या चार दिवसांमध्ये सिंहगडावर सुमारे 25 हजाराहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. या चार दिवसात तीन हजार 311 दुचाकी व एक हजार 833 मोटारी गडावर गेले होते.
हेही वाचा: “माझे माहेर पंढरी..”, या जयघोषात PM मोदींनी केलं पालखी मार्गाचं भूमिपूजन
वाहनातून आलेले पर्यटक मोजताना दुचाकीने दोन, तर चारचाकीने पाच पर्यटक गेले असे मोजतो. मोटारी एवढेच पर्यटक वडापमधून (खासगी प्रवासी वाहतूक करणारे वाहने) गेल्याचे मोजले जातात. त्यानुसार, दिवाळीत गुरुवारी चार नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन होते. त्यादिवशी 232 दुचाकी व 104 मोटारी व वडाप मधून असे दीड हजार पर्यटक गडावर पोचले होते. त्यानंतर शुक्रवारी पाडव्याच्या दिवशी 848 दुचाकी व 533 मोटारी वडाप अशातून सुमारे सहा हजार ७३३ पर्यटकांनी गडाला भेट दिली. तर भाऊबीज शनिवारी होती. त्यादिवशी 915 दुचाकी व 553 मोटारीने वडापमधून सहा हजार ५४२ पर्यटक गडावर आले होते. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने या पर्यटकांच्या गर्दीत आणखीन भर पडली आज 1280 दुचाकी व 643 मोटारी यातून वडापाव अशा वाहनातून एकूण आठ हजार 275 पर्यटक गडावर आले होते.
अशाप्रकारे या चार दिवसात 22 हजार 924 पर्यटक गडावर गेले. सिंहगडला जाताना डोणजे मार्गे आहेत. यामध्ये कोंढणपूर मार्गे चार दिवसात आलेल्या पर्यटकांचा समावेश नाही. या मार्गे तीन हजार पर्यटक गृहीत धरले तरी 25 हजार पेक्षा अधिक पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत.
हेही वाचा: “माझे माहेर पंढरी..”, या जयघोषात PM मोदींनी केलं पालखी मार्गाचं भूमिपूजन

घाटात वाहतूक कोंडी
शुक्रवार शनिवार आणि रविवार या तीन दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक गडावर गेले. या दिवशी गडावरील पार्किंग पूर्ण भरलं होतं. त्यानंतर घाट रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहने उभी केली होती. वाहने रस्त्यात लावून पर्यटक गडावर चालत गेले होते. यामुळे नवीन येणारी वाहनांना गडावर जाण्यास रस्ता नव्हता. खाली जाणारे वाहने अडकत होती. वारंवार घाटात वाहतूक कोंडी होत होती.
Esakal