शरीराची स्वच्छता ही आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. त्यासाठी आपण दररोज अंघोळ करतो. साबण, उटणे, शॅम्पू वापरून अंग आणि केसांची योग्य निगा राखतो पण तरीही आपली मान काळी पडते. कित्येकदा व्यवस्थित काळजी न घेतल्यास, दुर्लक्ष केल्याने, उन्हामुळे किंवा खोटे दागिने वापरल्यामुळे मान काळी पडू शकते. पण नंतर खूप प्रयत्न करूनही काळेपणा निघत नाही. आपला चेहरा छान दिसतो, पण मान काळी दिसते. पण मग यावर उपाय काय?

जाणून घ्या कशी स्वच्छ कराल काळी पडलेली मान

एक्सफोलिएशन-

अल्फा-हायड्रॉक्सी ऍसिडस् (AHAs) आणि बीटा हायड्रॉक्सी ऍसिडस् (BHAs) सह एक्सफोलिएट केल्याने त्वचा उजळ होण्यास मदत होते आणि ती स्वच्छ होते. दिवसातून दोनदा अशी उत्पादने वापरून मान स्वच्छ करता येऊ शकते.

वैद्यकीय उपचार-

तुम्ही नेहमी तुमच्या त्वचातज्ञाचा सल्ला घेऊ शकता आणि लेझर थेरपीसाठी जाऊ शकता. परंतु त्याआधी स्वतःची योग्य तपासणी करा, कारण तुमच्या काळ्या मानेमागचे कारण तुमच्या काही वैद्यकीय स्थितीशी देखील संबंधित असू शकते.

रेटिनॉइड्स- रेटिनॉइड्सच्या साहाय्याने त्वचेवरची घाण काढल्याने तुमची काळी मान साफ होण्यास खूप मदत होऊ शकते. परंतु या ट्रिटमेंटसाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सनस्क्रीन लावा- सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करणे हे देखील आपल्या मानेचा काळसरपणा कमी करण्यासाठी महत्वाचे आहे.
अॅपल सायडर व्हिनेगर- त्यात ऍसिटिक ऍसिड आहे, जे निस्तेज त्वचेवर तेज आणतं. त्वचेवर लावण्यापूर्वी ते पाण्यात समप्रमाणात मिसळा. सर्वोत्तम परिणामांसाठी 2-3 मिनिटांनंतर ते धुवा.
चेहरा किंवा मानेवर मास्क लावा- सर्वोत्तम परिणाम मिळविण्यासाठी तुम्ही आठवड्यातून दोन ती तीनवेळा चेहरा आणि मानेवर मास्क लावू शकतात.
कोरफड जेल- कोरफडीमध्ये अलॉइन असते, जे एक नैसर्गिक त्वचा उजळणारे एजंट असते. उत्तम परिणामांसाठी ते रात्री लावा आणि सकाळी धुवून टाका.
योग्य आहार आणि पाणी- भरपूर ताजी फळे खाण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये नैसर्गिकरित्या त्वचा उजळ करणारे घटक असतात. तसेच दररोज भरपूर पाणी प्या.
दूध- दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड असते जे त्वचेला उजळ करण्यास देखील मदत करते. प्रभावित भागावर दूध लावा आणि 20-30 मिनिटांनी धुवा.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here