रक्तदाब हा विशिष्ट जीवनशैलीमुळे निर्माण झालेला आजार. गेल्या काही वर्षांत त्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले गेले आहे. म्हणूनच अति किंवा कमी रक्तदाब निष्पन्न झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आधीच सजग होणे महत्त्वाचे आहे.

मिनरल वॉटर: बाटलीबंद मिनरल वॉटरमध्ये प्रतिलीटर २०० मिलीग्रॅम सोडीयम असतं जे आपण टाळू शकतो.
केचप: केचप सर्वात खारट मसाल्यांपैकी एक आहे. एक चमचा केचपमध्ये १९० मिलीग्राम सोडियम असते आणि जेव्हा तुम्ही ते फ्राईंसोबत एकत्र खाता तेव्हा मीठाचं प्रमाण खूपच जास्त होते.
फ्रेंच फ्राईज: रेस्टॉरंटमध्ये बनवलेल्या फ्रेंच फ्राईजवर जास्त मीठ शिंपडले जाते, त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो.
गोड पेय: साखरयुक्त पेयांमुळे वजन वाढते आणि रक्तदाबही वाढतो. जे लोक गोड पेये पितात त्यांना उच्च रक्तदाब होण्याचा धोका जास्त असतो.
बेकन: जास्त प्रमाणात कोलेस्टेरॉल, फॅट आणि मीठ असलेल्या बेकनमुळे बऱ्याचदा रक्तदाब नियंत्रित राहत नाही.
मस्का (चीज): चीज मध्ये सोडीयमची मात्रा जास्त असते. अमेरिकन चीज, पर्मेसन आणि ब्लू चीजसारख्या चीजमध्ये प्रति औन्स साधारणपणे ३०० मिलिग्रॅम सोडीयम असते.
लोणचे: लोणच्यामुळे पराठे, चीज थाळी किंवा डाळभात खायला मजा येते. परंतु लोणच्यामध्ये क्षार जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांनी लोणचे खाणे टाळावे.
रक्तदाब नियंत्रित करणे: तुमचा रक्तदाब नियमितपणे तपासण्याव्यतिरिक्त तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल किंवा तुमचा धोका कमी करायचा असेल तर ते टाळण्यासाठी येथे काही पदार्थ आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here