बीजिंग: जगात अमेरिकेला (America) हरवून महासत्ता बनण्याची आकांक्षा चीन बाळगत आहे. त्या दृष्टीनं त्यांनी पाऊल टाकण्यास सुरुवातही केलीय. अलीकडंच चीननं हायपरसोनिक क्षेपणास्त्राची JL-2 SLBM चाचणी केली. आण्विक क्षमतेनं सज्ज असलेली ही बॅलेस्टिक मिसाईल Ballistic Missile Submarine (पाणबुडी) अमेरिकेसाठी धोकादायक मानली जात आहे. या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून चीन इंडो-पॅसिफिक महासागरातूनच अमेरिकेतील शहरं उद्ध्वस्त करू शकतो. हाँगकाँग वृत्तपत्र साऊथ चायना मॉर्निंगच्या अहवालानुसार, बीजिंगनं अलीकडच्या काही वर्षांत लांब पल्ल्याच्या एसएलबीएम विकसित करण्यासाठी वेगानं काम केलंय.

हेही वाचा: सॅल्यूट! बाळाला डेस्कवर झोपवून महिला पोलीस कर्मचारी बजावतेय ‘कर्तव्य’

अहवालानुसार, 3 नोव्हेंबर रोजी अमेरिकन संरक्षण विभागाचं मुख्यालय पेंटागननं चिनी सैन्य आणि त्यांच्या सुरक्षा क्षेत्रात होत असलेल्या घडामोडींचा तपशीलवार अहवाल अमेरिकन काँग्रेसला सादर केलाय. या अहवालात सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलेली गोष्ट म्हणजे, चीनचा आण्विक शस्त्र कार्यक्रम (Nuclear Capable Submarine Launched Ballistic Missile) आहे. चीन आपल्या अण्वस्त्रांचा विस्तार करत असल्याचं अहवालात म्हंटलंय. 2027 पर्यंत चीनकडं 700 अण्वस्त्रे असू शकतात, तर 2030 पर्यंत हा आकडा 1000 पर्यंत पोहोचू शकतो. मात्र, चीनकडं सध्या किती अण्वस्त्रे आहेत, हे या अहवालात सांगण्यात आलेलं नाही.

हेही वाचा: खुशखबर! Emirates मध्ये 6,000 हून अधिक पदांसाठी भरती

बॅलिस्टिक क्षेपणास्त्र

बॅलिस्टिक क्षेपणास्त्र

पेंटागनच्या याच अहवालात चीनचा सबमरीन लाँच बॅलिस्टिक मिसाइल (SLBM) म्हणजेच, SLBM आणि न्यूक्लियर बॅलिस्टिक मिसाइल सबमरीन (SSBN) याचंही महत्व नमूद केलंय. या अहवालात चीनच्या पाण्यामध्ये असलेल्या शस्त्रास्त्रांबाबत पेंटागनच्या मूल्यांकनाबाबतही माहिती देण्यात आलीय. चीनच्या पीपल्स लिब्रेशन आर्मी नेव्हीकडे (PLAN) सध्या 094 प्रकारचे सहा SSBN आहेत, ज्याला सामान्यतः जिन-क्लास म्हणून ओळखलं जातं. यापैकी प्रत्येकाची 12 JL-2 SLBM उचलण्याची क्षमता आहे. याशिवाय, नवीन प्रकार 096 SSBN JL-3 SLBM म्हणून ओळखला जातो.

हेही वाचा: म्हैस, घोडीच्या शोधानंतर यूपी पोलिसांवर आमदाराचं ‘मांजर’ पकडण्याची जबाबदारी

चीनच्या नवीन सबमरीन लॉन्च बॅलिस्टिक मिसाइल (SLBM) बद्दल असं म्हटलं जात, की हे सबमरीन पाण्यापासून दूर न जाता किंवा बंदर न सोडता अमेरिकेच्या मुख्य भूभागावर हल्ला करू शकतं. चीननं पाणबुडीचा ताफा 66 वरून 76 असा केला असून यामध्ये हुलुडाओ शहरातील बोहाई यार्ड येथे बांधण्यात येणाऱ्या सहा नवीन आण्विक-सक्षम पाणबुड्यांचा समावेश आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here