कालपासून छठ या महापर्वाला सुरुवात झाली आहे. दिवाळी सणाच्या 6 दिवसांनी कार्तिक महिन्याच्या सहाव्या दिवशी छठ हा सण साजरा केला जातो.दिल्ली येथील यमुना नदीत विषारी फेस किंवा गाळ जमा झाला असून यातच भाविकांनी स्नान केले आहे तसेच धार्मिक विधी पार पाडला आहे.कालिंदी कुंज भागातील यमुना नदीत विषारी फेस तरंगत आहे. या फेसाच्या मध्यभागी भाविक स्नान करत आहेत.दिवाळीनंतर वाजवले जाणारे फटाक्यांमुळे तसेच वाढलेल्या प्रदूषणामुळे राजधानी दिल्लीतील हवा विषारी झाली आहे.यमुना नदीत अमोनियाची पातळी वाढली आहे. त्यामुळे हा फेस तयार झाला आहे. अमोनियाची पातळी वाढल्याने पाणीपुरवठाही विस्कळीत होत आहे.अशाप्रकारे फेस तयार होणे, ही आता काही नवी गोष्ट राहिली नाहीये. छठ सण चार दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी स्नान, दुसर्या दिवशी खरना, तिसर्या व चौथ्या दिवशी अनुक्रमे मावळत्या सूर्याला नदी किंवा तलावात उभे राहून अर्घ्य अर्पण करणे.छठ घाटातून समोर आलेली ही छायाचित्रे मन हेलावणारी तसेच धक्कादायक आहेत.