दिवाळी झाल्यानंतर लग्नाचा सिझन सुरू होतो. साखरपुडा, लग्नासाठी छान शॉपिंग सुरू होते. लग्नाचं शॉपिंग हे एक मोठ्ठ काम असतं. त्यात जर वधुच्या साडी वा लेहेंगा खरेदीत गडबड झाली तर पूर्ण लूक खराब होऊ शकतो. लग्नाआधी मुलींना ब्रायडल लेहेंगा घेण्याची वेळ आलेली नसते. जर तुम्ही बाजारातून लेहंगा खरेदी करणार असाल तर या सहा गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

संशोधन – तुमच्या मनाजोगता लेहेंगा खरेदी करायला थेट बाजारात जाऊन शोध घेऊ नका. त्याआधी थोडा रिसर्च करा. यासाठी इंटरनेटवर अनेक साईट्स मधून तुम्हाला अशा लेहेंग्यांची एकसोएक डिझाईन्स मिळतील, त्यातून जे आवडेल ते डिझाईन आणि बजेट ठरवून तुम्ही बाजारात खरेदीसाठी जाऊ शकता.

त्वचेचा रंग – तुमच्या लग्नासाठी लेहेंगा खरेदी करणं हे मोठं जिकरीचं काम आहे. खरेदी करतेवेळी तुमच्या स्किन टोनला कुठला रंग खुलून दिसेल याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. लेहेंग्याचे सर्व रंग तुमच्यावर खुलून दिसतीलच असं नाही. त्यामुळे रंगाची निवड अगदी काळजीपूर्व करा. लेहेंगा स्किन टोनला अनुरूप घेतल्याने तुमच्या सौंदर्यात भर पडेल.

योग्य कापड- लग्नाची खरेदी करताना लोकं मटेरियल आणि फेब्रिककडे फारसं लक्ष देत नाहीत. त्यामुळे लग्नाच्या दिवशी गोंधळ निर्माण होऊ शकतो. वधुचा ड्रेसचे फेब्रिक अयोग्य असू शकते. किंवा त्यावर केलेले भरतकाम तुमचा लुक बिघडवू शकते. म्हणून लग्नाचे कपडे खरेदी करतेवेळी ते योग्य पद्धतीने पारखून आणि एकदा वापरून पाहणे योग्य ठरेल.

हवामान- आपण ज्या ठिकाणी लग्न करणार आहोत, तेथील हवामानाचे भान लग्नाचा ड्रेस खरेदी करताना ठेवले पाहिजे. हिवाळ्यात लग्न करताना तुम्ही गडद रंगाचे कपडे निवडू शकता. पण तुमचे लग्न उन्हाळ्यात असेल तर तु्म्ही हलक्या शेडचा ड्रेस निवडावा. याशिवाय. तुम्ही कुठे लग्न करत आहात ती जागाही महत्वाची आहे. त्यानुसार खरेदी करणे फायद्याचे ठरेल.

शरीराचा आकार- लग्नासाठी लेहेंगा निवडताना मुली शरीराच्या आकाराची काळजी घेत नाहीत. खरेदीवेळी मॉडेल किंवा डमी बघून खरेदी केल्यास हमखास गोंधळ उडू शकतो. कारण मॉडेल आणि तुमच्या शरीराची रचना यात नक्तीच फरक असतो. म्हणूनच जो ड्रेस आवडला आहे तो एकदा घालण्याचा नक्की प्रयत्न करा. जर त्यात काही अडचणी असतील तर तु्म्ही तुमच्या डिझाईनरशी बोलून तो गोंधळ आधीच दुरूस्त करू शकता.

बदल- एकदा लेहेगा घरी आणला की तो कपाटात ठेवून दिला असे करू नका. आधी घालून बघा. किंवा फिटींग आणखी चागंल करण्यासाठी डिझाईनरकडे अल्टरेशनला द्या. डिझाईनर तुम्हाला सूट होईल अशाच पद्धतीने फिटींग करेल. परफेक्ट फिटींग नसेल तर एवढा महागडा ड्रेस घेऊनही तुम्ही बेढब दिसाल. त्यामुळे काळजी घ्या.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here