मुंबई – बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी साधारण दोन महिन्यांपूर्वी सर्वांच्या चर्चेचा विषय होती. त्याचे कारण तिच्या पतीला मुंबई क्राईम ब्रँचनं अटक केली होती. त्यानं अश्लील व्हिडिओ तयार करुन ते शेयर केले होते. परदेशात ते व्हिडिओ पाठवून अनेकांची फसवणूक केल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला होता. यावेळी अभिनेत्री शर्लिन चोप्रा, पूनम पांडे यांनीही त्याच्यावर वेगवेगळे आरोप केले होते. यासगळ्याचा मोठा मानसिक त्रास शिल्पाला झाला होता. तिला मोठया प्रमाणात ट्रोल व्हावे लागले होते.

पॉर्नोग्राफी प्रकरणात राज हा दोन महिने तुरुंगात होता. त्याला सप्टेंबर मध्ये जामीन मिळाला.



Esakal