आपल्या सर्वांनाच माहित आहे की महिलांमध्ये स्तनांचा कर्करोगचा (Breast Cancer ) धोका असतो पण पुरुषांनाही धोका होण्याची नाकारता येत नाही. पुरुषांमध्ये स्तनांच्या कर्करोग होण्याचे प्रमाण दुर्मिळ आहे. वैदयकीय पुरव्यानुसार, पुरुषांना कर्करोग होण्याचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी आहे. साधारण 2650 पुरुषांना कर्करोग होण्याचा धोका संभवू शकतो आणि 530 पुरुषांचा त्यामुळे मृत्यू होऊ शकतो. पुरूषांमध्ये स्तानांचा कर्करोग होण्याचे प्रमाण अत्यल्प असले तरीही शक्यता नाकारू नये. त्यामुळे पुरुषांमध्ये स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे काय आहेत याबाबत जागरुक असणे गरजेचे आहे.

स्तनाचा कर्करोग

स्तनाचा कर्करोग

वृध्द पुरुषांमध्ये स्तनांचा कर्करोग होणे सामान्य आहे.

सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रिवेंशन (CDC) अनुसार,स्तनांच्या कर्करोगाचा धोका हा वयासोबत वाढत जातो. सामान्यता वयाच्या 50शी नंतर स्तनांच्या कर्करोग झाल्याचे आढळते.

आरोग्य संस्थेने सांगितले आहे की, ”पुरूषांमधील स्तनांचा कर्करोग ओळखण्यासाठी स्तनांची नियमित तपासणी करणे प्रभावी उपाय ठरू शकतो.”

स्तनाचा कर्करोग

स्तनाचा कर्करोग

काळजी घेण्यासाठी इतर काही लक्षणे आहेत का?

पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोग ओळखण्यासाठी अनेक लक्षण दिसतात. अमेरिकन कॅन्सर सोसायटी (ACS) नुसार, पुरुष स्तनाच्या कर्करोगाची काही सामान्य लक्षणे खाली दिली आहेत.

– एका स्तनामध्ये वेदनारहित गाठ येणे

– स्तनाग्र मागे जाणे, व्रण येणे आणि स्त्राव होणे

– स्तनाचे डिंपलिंग

– स्तन किंवा स्तनाग्र त्वचेचा रंग खराब होणे

स्तनाचा कर्करोग

स्तनाचा कर्करोग

वर नमुद केलेली लक्षणे ही कर्करोगा झाल्यानंतर सुरूवातीच्या टप्यात दिसतात पण,आणखी काही लक्षण आहे ज्यामुळे कर्करोग पसरतो आहे हे समजते. लिम्फ नोड्समध्ये सूज येणे, स्तनांमध्ये वेदना होणे आणि हाडे दुखणे अशी लक्षणे असल्यास कर्करोग अधिक गंभीर असू शकतो.

स्तनाचा कर्करोग

स्तनाचा कर्करोग

पुरुषांमध्ये कोणत्या प्रकारचे स्तन कर्करोगाचे निदान केले जाऊ शकते आणि कसे?

CDC नुसार पुरुषांमध्ये 3 प्रकारचे स्तनांचा कर्करोग आढळतात आणि त्यांचे निदान केले जाऊ शकतो

– इनवेसिव्ह डक्टल कार्सिनोमा: (Invasive ductal carcinoma): अशा प्रकारचा कर्करोग नसिकामध्ये निर्माण होऊ शकतो आणि नसिकांबाहेर पडून तो स्तनांच्या उतींमध्ये आणि इतर भागांमध्ये पसरू शकतो.

स्तनाचा कर्करोग

स्तनाचा कर्करोग

– इनवेसिव्ह लोब्युलर कार्सिनोमा: (Invasive lobular carcinoma : या प्रकारामध्ये Lobules मध्ये कर्करोगाची सुरवात होते आणि मग हळू हळू ते स्तनांच्या उतींमध्ये तो परसरतो.

– डक्टल कार्सिनोमा इन सिटू (DCIS- Ductal carcinoma in situ): या प्रकारातील स्तनांचा कर्करोग आक्रमक असू शकतो कारण त्याची सुरूवात नसिकांमध्ये निर्माण होतो पण तो इतर स्तनांच्या उतींमध्ये परसरत नाही.

पुरुषांमध्ये होणारा कर्करोग अनुवांशिक असू शकतो.

स्तनांचा कर्करोग हा अनुवांशिकही असू शकतो. स्तनांच्या कर्करोगामध्ये गंभीर स्वरुपाची कौंटुबिक पार्श्वभूमी असल्यास पुरुषांमध्ये स्तनांचा कर्करोग होण्याचा धोका संभवू शकतो.

असामान्य BRCA1 किंवा BRCA2 हे जीन्स अनुवाशितेने पुरुषांना मिळाले असल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. पण फक्त अनुवांशिकतेमुळेच पुरुषांना स्तनांचा कॅन्सर होऊ शकतो असे नाही.

स्तनाचा कर्करोग

स्तनाचा कर्करोग

पुरुषांमध्ये होणारा कर्करोगवर उपचार

गाठीच्या आकारानुसार डॉक्टर उपचार करण्याचा सल्ला देतात. स्तनाच्या कर्करोगासाठी शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, हार्मोन थेरपी आणि टार्गेटेड थेरपी असे काही उपलब्ध उपचार आहेत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here