छत्तीसगडच्या ‘बस्तर’चं नाव ऐकलं, की सहसा नक्षलवादानं ग्रस्त असलेल्या मागास भागाची प्रतिमा मनात येते. पण, या लाल मातीचं आणखी एक रूप आहे, ज्याबद्दल बहुतेक जगाला माहिती नाही. इथल्या निसर्गसौंदर्यामुळं पाणी, जंगल आणि जमीन पर्यटकांना भूरळ घालत असतात.

इंद्रावती नदी बस्तर विभागातील दंतेवाडा जिल्ह्यात वसलेल्या मुचनार गावच्या एका बाजूने वाहते. या गावात इंद्रावती नदीच्या सुंदर खोऱ्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येतात.
बस्तरच्या जगदलपूरमधील मेंद्री घूमर धबधबा नेहमी पर्यटकांना आकर्षित करीत असतो. या दरीला ‘व्हॅली ऑफ फॉग’ असंही म्हणतात. हे चित्र पाहून तुम्हाला त्याच्या सौंदर्याचा अंदाज येईल.
एकेकाळी बस्तरच्या राजघराण्याचं वास्तव्य असलेला हा राजवाडा आज जगदलपूरचं मुख्य आकर्षण आहे. आता या राजवाड्याचं स्मारकात रूपांतर झालंय. जिथं राजघराण्यातील विविध कलाकृती आणि चित्रं ठेवण्यात आली आहेत.
छत्तीसगडमधील इंद्रावती नदीवर (जि. बस्तर) बांधलेल्या चित्रकूट धबधब्याला भारताचा ‘नियाग्रा धबधबा’ असंही म्हणतात. तो 95 फूट उंचीवरून कोसळतो आणि कित्येक किलोमीटर दूरवरूनही त्याचा आवाज ऐकू येतो.
ढोलकल टेकडी बस्तरच्या दंतेवाडा शहरापासून 22 किमी अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 3 हजार फूट उंच शिखरावर गणेशाची मूर्ती आहे. बस्तरचे स्थानिक आदिवासी भगवान गणेशाला आपला रक्षक मानतात आणि त्याची पूजा करतात.
बस्तर विभागातील जशपूर जिल्ह्यात ‘देश देखा’ हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. प्राचीन काळी या भागावर राज्य करणारे राजे येथूनच आपले संस्थान पाहत असत. हा जशपूरचा सूर्योदय बिंदू देखील आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here