बॉलिवूड अभिनेता आशुतोष राणा याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बहुतांशी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार्‍या आशुतोषने आपल्या कारकिर्दीत एकापेक्षा एक दमदार चित्रपट दिले आहेत. पण खूप कमी लोकांना माहिती आहे,की आशुतोषला अभिनेता व्हायच नव्हतं.

आशुतोषचा जन्म १९६४ मध्ये मध्य प्रदेशातील गदरवाडा येथे झाला. त्यांनी शिक्षणासाठी सागर येथील डॉ.हरिसिंग गौर विद्यापीठ गाठलं.
येथे त्याला विद्यार्थी नेता बनायचं होतं. पण यादरम्यान त्यांची भेट त्याचे गुरू देवप्रकाश शास्त्री यांच्याशी झाली.
नंतर त्यांनी आशुतोषला राजकारण सोडून अभिनय करण्याचा सल्ला दिला.
आशुतोषने कुस्तीपटू व्हावे अशी वडिलांची इच्छा होती. मात्र, त्याला कुस्तीमध्ये अजिबात रस नव्हता.
नंतर आशुतोषने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला.
एनएसडी सोडल्यानंतर आशुतोषने अनेक नाटकांमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी छोट्या पडद्यापासून करिअरला सुरुवात केली
१९९५ मध्ये त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण १९९८ मधील दुष्मन या चित्रपटातून त्याला प्रसिद्धी मिळाली.
असं म्हटलं जातं जेव्हा तो चित्रपटांमध्ये करिअर करण्यासाठी निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांना भेटायला गेला तेव्हा त्यांनी भारतीय परंपरेनुसार त्यांच्या पाया पडला. यावरून महेश भट्ट भडकले आणि आशुतोषला चित्रपटाच्या सेटवरून हाकलून दिलं.
तर आशुतोषने जख्म, दुश्मन, संघर्ष,यांसारख्या चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here