मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक (nawab malik) यांना उत्तर देण्याचे आदेश दिलेले असतानाच आता एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्या मेहुणीने दाखल केलेल्या तक्रारीने मलिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे यांच्या मेहुणीबद्दल ट्वीट करत मलिकांनी सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर आता मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.
गोरेगाव पोलीस ठाण्यात FIR
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे आणि नवाब मलिक असा कलगीरतुरा रंगलेला दिसत आहे. मलिक यांनी सोमवारी (8 नोव्हेंबर) एक ट्वीट करत समीर वानखेडेंना प्रश्न विचारला होता. या ट्वीटमध्ये मलिकांनी समीर वानखेडेंच्या मेहुणीचा उल्लेख केलेला होता. याच ट्वीटवरून आता वानखेडे यांच्या मेहुणीने विटंबना केल्याचा आरोप करत मलिकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या मेहुणी तसेच अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या बहीण हर्षदा दीनानाथ रेडकर यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. हर्षदा रेडकर या ड्रग्ज व्यवसायात असल्याचं मलिक यांनी म्हटलं होतं. मात्र आता क्रांती रेडकर यांच्या बहिणीच्या वकिलाने गोरेगाव पोलीस ठाण्यात नवाब मलिक यांच्याविरोधात लेखी तक्रार दिली आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी क्रांती रेडकर हिची बहीण आणि एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा रेडकर यांच्याविषयी ट्वीट केलं होतं. हे ट्वीट करतानाच मलिक यांनी समीर वानखेडे यांना प्रश्नही विचारला होता. त्यानंतर आता समीर वानखेडे यांच्या मेहुणीने गोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या तक्रारीत नवाब मलिक आणि निशांत वर्मा यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 354, 354 ड, 503 यासह स्त्रियांचं अश्लील प्रदर्शन प्रतिबंध कायदा-1986 च्या कलम 4 खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: फडणवीसांच्या आरोपांवर आज नवाब मलिक
फोडणार ‘हायड्रोजन बॉम्ब’
तक्रारीत म्हटलंय….
‘कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणातील आरोपी समीर वानखेडे यांना भीती वा धमकावण्यासाठी मलिक आणि वर्मा यांना प्रोत्साहित करीत आहेत. वैयक्तिक स्वार्थ आणि शत्रूत्वाच्या उद्देशाने काही लोकांनी ओढण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण पुण्यातील न्यायालयात प्रलंबित आहे. वर्मा स्वतःला राजकीय विश्लेषक समजतात मात्र, ते अफवा पसरवत असून, जो त्यांना पैसे देतो त्यांच्या वतीने सोशल मीडियावर सक्रिय आहेत.’नवाब मलिक हे राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत. त्याचबरोबर आमदारही आहेत. मात्र, त्यांच्या कर्तव्याबाबत ते क्वचितच चर्चेत असतात. कॉर्डेलिया क्रुझ प्रकरणातील अनेक व्यक्ती, ज्यांच्यात स्वतःची ओळख उघड करण्याची हिंमत नाही, ते या दोघांना प्रोत्साहित करत आहेत. जेणेकरून समीर वानखेडे यांनी आरोपीविरुद्ध दाखल केलेले गुन्हे कुमकुवत करण्यासाठी वानखेडे यांना धमकावता येईल.’
हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर लवकरच शस्त्रक्रिया
Esakal