रेड वाईन बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या द्राक्षांचा उरलेला पल्प खूप पौष्टिक असतो
तुम्हाला माहीत आहे का, रेड वाईन बनवण्यासाठी वापरल्या जाणार्या द्राक्षांचा उरलेला पल्प खूप पौष्टिक असतो आणि मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास देखील मदत करू शकतो? कॉर्नेल युनिव्हर्सिटीने केलेल्या नवीन अन्न विज्ञान अभ्यासानुसार, रेड वाईन द्राक्षांचा पल्प मानवी आतड्यांवर आणि पोटाच्या मायक्रोबायोमवर आरोग्यदायी परिणाम करू शकतो.

खरंतर या विषयावर अजून संशोधन होण्याची गरज असताना, न्युट्रिएंट्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि मधुमेहाचे धोके कमी करण्यात हा शोध भूमिका बजावू शकतो. “वाईन बनवण्याच्या या उपउत्पादनात महत्त्वाची क्षमता आहे. जर आपण यातील काही मुख्य घटक वेगळे करून ते आहारातील घटक म्हणून वापरू शकलो, तर द्राक्ष पोमेस हे अनेक आरोग्यदायी फायदे देणाऱ्या अन्नाचा पौष्टीक आणि टिकाऊ स्रोत बनू शकतो. ” असं कृषी आणि जीवन विज्ञान महाविद्यालयाच्या अन्न विज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.इलाड टाको यांनी सांगितले.

या अभ्यासात टाको संशोधन गटाने खासकरून न्यू यॉर्कच्या फिंगर लेक्स प्रदेशात आढळणाऱ्या लाल द्राक्षाच्या जाती तपासल्या, जिथे मजबूत वाइनरी अर्थव्यवस्था अस्तित्वात आहे.

द्राक्षे आणि द्राक्ष उत्पादनांच्या आहारातील समावेशामुळे आरोग्यावर होणारे परिणाम तपासण्यासाठी टीमने व्हिटिस व्हिनिफेरा (वाइन द्राक्षे), व्हिटिस लॅब्रुस्काना (कॉनकॉर्ड द्राक्षे) आणि एक आंतरविशिष्ट संकरित वापरले.

व्हिव्हो मॉडेल म्हणून कोंबडीचा वापर करून शास्त्रज्ञांनी स्टिलबेन्स, रेझवेराट्रोल आणि टेरोस्टिलबेनचे फायदे निर्धारित करण्यात यशस्वी झाले.

गॅलस गॅलसचा गर्भाचा टप्पा (फतिल अंडी) 21 दिवसांचा असतो, जेव्हा गर्भ अम्नीओटिक द्रवपदार्थाने (अंड्यांचा पांढरा भाग) वेढलेला असतो, 21 व्या दिवशी उबण्यापूर्वी गर्भ नैसर्गिकरित्या तयार होतो.
या प्रयोगात, भ्रूण विकासाच्या 17 व्या दिवशी, स्टिलबेन्स अर्क अंड्यातील अम्नीओटिक द्रवपदार्थात टोचला गेला, ज्यामध्ये बहुतेक पाणी आणि पेप्टाइड्स होते. अम्नीओटिक द्रवपदार्थ आणि जोडलेले पौष्टिक द्रावण भ्रुणाने उबण्याच्या 19 व्या दिवशी सेवन केले होते, टॅकोने विकसित केलेल्या या पद्धतीला “इंट्रा अॅम्नीओटिक अॅडमिनिस्ट्रेशन ” असे म्हणतात


Esakal