दिवाळीच्या मुहूर्तावर अनेकजण नवनवीन वस्तू खरेदी करतात. मराठीतील अनेक कलाकारांनी यंदाच्या दिवाळीत आलिशान कार खरेदी केल्या आहेत.

अभिनेत्री भाग्यश्री मोटेनंही दिवाळीच्या निमित्ताने नवीन गाडी विकत घेतली आहे.
भाग्यश्रीने पहिल्यांदाच गाडी विकत घेतली आहे.
मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीवनेही अखेर तिची कार घेण्याची इच्छा सत्यात घडवून आणली आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत बरकतची भूमिका साकारलेला अभिनेता अमोल नाईक यानेसुद्धा नवीन कार खरेदी केली.
‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता हार्दिक जोशी याने ही नवी गाडी खरेदी केली आहे.
या आलिशान गाडीसोबतचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील अभिनेत्री गिरीजा प्रभूने दिवाळीच्या काही काळ आधी नवीन कार विकत घेतली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here