दिल्ली: दिल्लीत यमुना नदीतील विषारी फेस घाटावर रोखण्यासाठी कालिंदी कुंजमध्ये बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. दिल्लीत लागोपाठ दुसऱ्या दिवशी हवेची गुणवत्ता सर्वात खराब नोंदवली गेली आहे. आज दिल्लीची हवा गुणवत्ता निर्देशांक (AQU) ३८२ आहे, अशी माहिती हवा गुणवत्ता आणि हवामान पूर्व अंदाज आणि संशोधन प्रणालीने (SAFAR) दिली आहे.

यमुना नदीतील प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढली आहे.
प्रदूषित यमुना नदीत विहार करताना बदक
छठ पूजेच्या निमित्त दिल्लीच्या रामघाटात प्रदूषित यमुना नदीत भाविकांनी स्नान केले.
एका महिलेने सांगितले, की घाटावर कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. पाणी प्रदूषित आहे. सरकारला याबाबत काहीतरी करायला हवे. या घाटाला खूप महत्त्व आहे.
छठ पूजेला येणाऱ्या भाविकांना रोखण्यासाठी यमुना नदी काठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.
यमुना काठावर छठ पूजेसाठी आलेल्या लोकांना मागे जाण्यास सांगताना पोलिस
बॅरिकेड्स लावताना मजूर

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here