हिवाळा सुरू झाल्यावर वातावरण आल्हाददायक होते. थंडी सुरू झाल्याने लोकं थंडीपासून वाचण्यासाठी लोकरीचे कपडे वापरतात. मात्र थंडीपासून वाचण्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करायला पाहिजे. हे पदार्थ खाल्ल्याने तुमचे शरीर उबदार राखण्यास मदत होईल. तसेच आजारी पडण्याची शक्यता कमी होईल. म्हणजेच तुमच्या शरीरातील इम्युनिटी वाढेल.
रताळे- कॅलरीज आणि उच्च पोषक तत्वांमुळे हिवाळ्यात रताळे खाल्ल्याने शरीराला प्रचंड ऊर्जा मिळते. याच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठता, रोगप्रतिकारशक्ती आणि जळजळ यांसारख्या समस्या दूर होतात.
सलगम- सलगम आणि त्याची पाने हिवाळ्यात खाणे अतिशय.चांगले. सलगममध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका कमी करते. व्हिटॅमिन-के आणि व्हिटॅमिन-ए पोटॅशियम हे खाल्ल्याने चांगले मिळते.
खजूर- कमी चरबीयुक्त पदार्थ म्हणून खजूर ओळखला जात असून तो हिवाळ्यात अवश्य खावा. त्यामुळे वजन वाढत नाही. उलट भरपूर पोषक तत्वे मिळतात.
बदाम- अक्रोड- थंडीत हे पदार्थ खाणे अतिशय चांगले. बदाम आणि अक्रोड खाल्ल्याने आपली मज्जासंस्था सक्रिय राहते.. इन्सुलिन प्रक्रिया सुधारते. तसेच हृदयाचे आरोग्यही सुधारते.
नाचणी –  हिवाळ्यात नाचणीमुळे आरोग्याला खूप फायदा होतो. जर तुम्ही वेगन असाल तर कॅल्शियमसाठी तुम्ही नाचणीची निवड करू शकता. नाचणी खाल्ल्याने तुम्हाला निद्रानाश, चिंता आणि नैराश्याचा त्रास कमी होतो.
बाजरी- बाजरीमध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. यामध्ये जास्त प्रमाणात आयर्न असल्यामुळे अॅनिमियामध्ये खूप फायदा होतो. याचे नियमित सेवन केल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here