गेल्या काही काळापासून उमामी पदार्थ खाण्याचा ट्रेंड वाढतो आहे. आपल्याला साधारणपणे गोड, आंबट, कडू, खारट अशा चवी माहिती आहेत. पण उमामीमध्ये त्याची स्वतःची अशी आंबट- गोड चव असते. यात तुमच्या मूडनुसार तुम्हाला खाद्यपदार्थ कुरकुरीत किंवा कधी मसालेदार वाटू शकतात. उमामी पदार्थ वजन कमी करण्याबरोबरच इतर आजारांसाठी फायदेशीर असतात. या श्रेणीतील खाद्यपदार्थांमध्ये एल-ग्लूटामेट्स (एक प्रकारचे अमीनो आम्ल) जास्त असते. म्हणूनच नियमितपणे उमामी पदार्थांचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. हे पदार्थ असे आहेत.

मशरूम- मशरूममध्ये 180 मि.ली. ग्लूटामेट असते. यामुळे शरीरातील चरबी कमी होऊन वजन संतुलित ठेवले जाते. तसेच मशरूम खाल्ल्याने कर्करोगासारख्या आजारापासून तुम्ही दूर राहता.

देसी चीज-पनीर चवीला उत्कृष्ट असते. पण आपल्या शरीरासाठीही ते फायदेशीर आहे. पनीरमध्ये असलेल्या प्रोटीओलिसिस या घटकामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

अक्रोड- सकाळी नाश्त्याला अक्रोड स्मुदी प्यायल्यास किंवा संध्याकाळी अक्रोड खाल्ल्यास ते वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. अक्रोड मध्ये फायबर असते. त्यामुळे भूकेवर नियंत्रण राहाते आणि अतीखाणे होत नाही.

समुद्री खाद्यपदार्थ- ऑयस्टर, कोळंबी, स्कॅलॉप्स, मॅकरेल, ट्यूना आणि सार्डिन हे नैसर्गिक उमामी सीफूड असून पौष्टीक आहेत. हे पदार्थ खाल्ल्याने कर्करोग, मधुमेह या आजारांपासून आपले संरक्षण होते, असे संशोधनानुसार स्पष्ट झाले आहे.

टोमॅटो

टोमॅटो

टोमॅटो- टोमॅटो पिकायला लागल्यावर त्यातील ग्लूटामेटची पातळी वाढते. आंबट- गोड चवीच्या टोमॅटोचे ज्यूस प्यायल्याने तुमचे वजन नियंत्रणात येऊ शकते.

वजन

वजन

असे आहेत फायदे

– हे एक चांगले प्रोटीन सप्लिमेंट आहे.

– यामुळे शरीरात सोडियमची कमतरता राहत नाही

– जेवणाआधी हे पदार्थ खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहते. त्यामुळे तुम्ही जास्त खात नाही.

– या पदार्थात असलेल्या अमिनो अॅसिड मुळे स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

– उमामी चवीचे अन्न खाऊन पचन चांगले होते.

– हे पदार्थ खाल्ल्याने कॅन्सर, मधुमेहासारखे आजार होत नाहीत.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here