जगभरात आपल्या कामानं लोकप्रिय झालेली आणि नोबेल शांती पुरस्कार मिळवणारी सामाजिक कार्यकर्ती मलाला युसूफजाई हिचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. तिला जगभरातून वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी शुभेच्छा दिल्या आहे. मलाला ही जागतिक पातळीवरील सेलिब्रेटी आहे. तिच्या कामाचं कौतूक अनेक देशांनी केलं आहे. त्यामुळे तिच्याबद्दलच्या प्रत्येक कामाची, वक्तव्याची नोंद आणि दखल घेतली जाते. त्याचा परिणामही तातडीनं दिसून येतो. गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अखेर काल तिचा विवाहसोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

मलालानं आपला बालपणीचा मित्र असरसोबत लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यालाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांनी त्यांच्या भविष्यातील वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आता बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी देखील या दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये प्रियंका चोप्रा, कॅटरिना कैफ, यांचा समावेश आहे. प्रियंकानं लिहिलं आहे की, मलाला तुला अनेक शुभेच्छा. तिनं मलाला एक इमोजी शेयर करुन तिचं अभिनंदन देखील केलं आहे. या सोहळ्यासाठी तुला अनेक शुभेच्छा. कॅटरिनानं लिहिलं आहे की, मलाला तुझ अभिनंदन आणि तुला खूप खूप शुभेच्छा. याशिवाय काही पाकिस्तानी कलाकारांनी देखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये अभिनेता नूर अब्बास सिद्धीकीचा समावेश आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुंएसर मोबीननं लिहिलं आहे की, मलाला तुझं कौतूक आणि तुला खूप खूप शुभेच्छा. गायिका मीशा रफीनं देखील मलालाचं कौतूक केलं आहे. याशिवाय अभिनेता अदनान मलिकनं त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मलालानं काही निवडक पाहूण्यांच्या उपस्थितीत विवाह केला. त्याचे फोटोही तिनं सोशल मीडियावर शेयर केले आहेत. त्याला जगभरातून प्रतिसाद मिळाला आहे. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी मलालाला शांततेचं नोबेल मिळालं होतं. 2012 मध्ये लहान मुलींसाठी शिक्षण अभियान तिनं सुरु केलं होतं. त्यामुळे तिला तालिबान्यांनी तिच्यावर हल्ला केला होता.

हेही वाचा: Movie Review; ‘जय भीम’ सणसणीत ‘चपराक’

हेही वाचा: ‘तारक मेहता’च्या’ टप्पू – बबिताचं बिंग अखेर फुटलं

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here