खासगी बसेस, काळी-पिवळी टॅक्सी आदी गाड्यांनी बसस्थानकाचा ताबा घेतला.

सांगली- एसटी कर्मचाऱ्यांच्या (S T Workers Strike) संपामुळे विविध आगारांचे बसस्थानक काही दिवसापासून ओस पडले आहेत. गृह विभाग (परिवहन) ने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बसस्थानकातून खासगी प्रवासी बसेस, स्कूल बस, मालवाहू वाहने आदींना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. सांगलीत (Sangli)आज खासगी बसेस, काळी-पिवळी टॅक्सी आदी गाड्यांनी बसस्थानकाचा ताबा घेतला. एसटीच्या फलाटावर काळी-पिवळी जीप लागल्याचे चित्र पहिल्यांदाच दिसून आले.

एसटीचे शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी राज्यात गेल्या काही दिवसापासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.
गृह विभाग (परिवहन) ने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बसस्थानकातून खासगी प्रवासी बसेस, स्कूल बस, मालवाहू वाहने आदींना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे.
ऐन दिवाळी सणासुदीच्या काळात गावाकडे परतणाऱ्या प्रवाशांची आणि नियमित प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे.
सांगलीतून जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली.
गाड्यांनी बसस्थानकाचा ताबा घेतला. एसटीच्या फलाटावर काळी-पिवळी जीप लागल्याचे चित्र पहिल्यांदाच दिसून आले.
खासगी वाहतूक आगारातून सुरु असताना शहर पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, पोलीस उपनिरीक्षक दीपक माने यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत बंदोबस्त ठेवला आहे.
सांगलीसह विविध आगारात या खासगी गाड्या तैनात केल्या आहेत. एसटीच्या तिकिटाप्रमाणे यांना दर आकारण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
काळ्या पिवळ्या गा़डीतून पुढील प्रवासाला जाण्यासाठी प्रवाशांची झालेली गर्दी
सांगली जिल्ह्यात एकूण एक हजारच्या वर काळ्या पिवळ्या टॅक्सी आहेत.
एसटीचे शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी पुकारलेल्या संपात सहभागी कर्मचारी.
गावाकडे परतणाऱ्या प्रवाशांची आणि नियमित प्रवाशांची सोय झाली.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here